फडणवीस मंत्रिमंडळात १३ मंत्री ‘IN’ तर ६ मंत्री ‘OUT’, ‘या’ मंत्र्यांनी दिले राजीनामे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला आहे. एकूण १३ नेत्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात युतीने १०-२-१ हा फाॅर्म्युला मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी वापरला आहे. ज्यांनी शपथ घेतील त्यातील १० नेते भाजपचे, २ शिवसेनेचे, तर १ रिपाइंचे असे आहेत. १३ मंत्र्यापैकी ८ मंत्र्यांनी कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, तर ५ जणांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारात डावलण्यात आल्याने भाजप शिवसेनेत नाराजीचे सत्र सुरु होते. मात्र मंत्रीमंडळाचा विस्तार पार पडताच ६ विद्यमान मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. गृहनिर्माण मंत्री आणि घोटाळ्याचा आरोप असणाऱ्या प्रकाश मेहता यांनाही मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे प्रकाश मेहता आणि त्यांच्यासह राजकुमार बडोले, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अंबरिश अत्राम यांनी आपापल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

या सहाही मंत्र्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही तातडीने त्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. त्यामुळे राजकिय वर्तुळात नाराजीचे सुर दिसत आहेत. त्यामुळे या मंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.

राजीनामे दिलेले मंत्री आणि त्यांचे मंत्रीपद

१. राजकुमार बडोले – भाजप – सामाजिक न्यायमंत्री

२. प्रकाश मेहता – भाजप – गृहनिर्माण मंत्री

३. विष्णू सावरा – भाजप – आदिवासी विकास मंत्री

४. प्रवीण पोटे – भाजप – पर्यायवरण राज्यमंत्री

५. दिलीप कांबळे – भाजप – सामाजिक न्याय राज्यमंत्री

६. अंबरीश अत्राम – भाजप – आदिवासी विकास राज्यमंत्री

मंत्रिपदाची शपथ घेतलेले नेते आणि त्यांची पदे

१.   राधाकृष्ण विखे पाटील- भाजप, कॅबिनेटमंत्रीपद

२.   आशिष शेलार- भाजप, कॅबिनेटमंत्रीपद

३.   जयदत्त क्षीरसागर- शिवसेना, कॅबिनेटमंत्रीपद

४.   संजय कुटे- भाजप, कॅबिनेटमंत्रीपद

५.   सुरेश खाडे- भाजप, कॅबिनेटमंत्रीपद

६.   अनिल बोंडे- भाजप, कॅबिनेटमंत्रीपद

७.   अशोक उईके- भाजप, कॅबिनेटमंत्रीपद

८.   तानाजी सावंत- शिवसेना, कॅबिनेटमंत्रीपद

९.   योगेश सागर- भाजप, राज्यमंत्री

१०. संजय उर्फ बाळा भेगडे- भाजप, राज्यमंत्री

११. परिणय फुके- भाजप, राज्यमंत्री

१२. अतुल सावे- भाजप, राज्यमंत्री

१३. अविनाश महातेकर- रिपाइं, राज्यमंत्री

सिने जगत –

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या मृत्यूनंतर झाले ‘असे काही’ की बनले ‘डिस्को डान्सर’

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य