पुण्यात गॅस गळती झाल्यानं 6 महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, आई-वडिल जखमी (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गॅस गळती होऊन स्फोट झाल्याने सहा महिन्याच्या बाळासह बाळाचे आई-वडील जखमी झाले. या दुर्घटनेत सहा महिन्याचा बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना पुण्यातील खराडी येथे आज (सोमवार) सकाळी पावणे आठच्या सुमारास घडली. स्वराली भवाळे (वय – 6 महिने) असे मृत्यू झालेल्या बाळाचे नाव आहे. तर शंकर भवाळे (वय-28), आशाताई भवाळे (वय-26) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

पुण्यातील खराडी परिसरात आज सकाळी गॅस गळतीमुळे स्फोट झाला. यामध्ये कुटुंबातील तीनजण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये सहा महिन्याची स्वराली गंभीर जखमी झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

पुण्यात गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात तिघे जखमी

पुणे : पुण्यातील खराडी येथे सोमवारी सकाळी गॅस गळती होऊन त्यात मोठा स्फोट होऊन आग लागली. सहा महिन्याच्या मुलीसह आईवडिल गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना खराडीमधील संभाजीनगर येथे सोमवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

Geplaatst door Policenama op Zondag 26 januari 2020

मिळालेल्या माहितीनुसार, भवाळे कुटुंब खराडी येथील संभाजीनगरमध्ये राहतात. रविवारी रात्री हे कुटुंबीय झोपेत असताना घरातील गॅस गळती होऊन संपूर्ण घरात गॅस पसरला. सकाळी पावणे आठच्या सुमारास आशाताई यांनी पाणी तापवण्यासाठी गॅस पेटवला असता मोठा स्फोट होऊन आग लागली. हा स्फोट एवढा भयानक होती की यामुळे चार घरावरील पत्रे उडून गेले. तर स्वयंपाकघरातील ओट्याचेही यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. स्फोटानंतर लागलेल्या आगीत घरातील सर्व कपडे आणि इतर साहित्य जळून गेले. अग्निशमन दलाने ही आग तातडीने विझविली.

You might also like