धक्कादायक ! डॉक्टरनं Google वर सर्च करून दिलं इंजेक्शन, 6 महिन्याच्या बालकाचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  ओडिशाच्या दाबुगाम आरोग्य केंद्रात डॉक्टरांच्या बेजबाबदार वाण्याची एक घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये निमोनियाने ग्रस्त सहा महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. खरं तर येथे गुगलवर सर्च करून इंजेक्शन दिल्याने, बालकाचा मृत्यू झाला आहे.

मुलाचे पालक प्रशांत बिसोई आणि अमृता यांचे म्हणणे आहे की ३० मार्च रोजी मुलाची प्रकृती खालावली. ३१ मार्चला त्याला दाबुगाम आरोग्य केंद्रात दाखविण्यात आले. कुटुंबाचा आरोप आहे की त्यांच्या मुलाला पाहणाऱ्या डॉक्टरांनी गुगलवर सर्च करून औषधांचे प्रिस्क्रिप्शन बनविले होते.

ओडिशा टीव्हीनुसार, मुलाच्या पित्यांनी सांगितले की डॉक्टरांनी आम्हाला आमच्या मुलाला इंजेक्शन लावण्यास सांगितले. त्यांनी हे इंजेक्शन त्यांच्या मतानुसार नाही तर गुगलवर शोधून दिले होते. इंजेक्शन लावल्यानंतर काही वेळातच बालकाने आपले डोळे मिटले आणि त्याचा मृत्यू झाला. ते पुढे म्हणाले की तेथील डॉक्टरांनी मुलाची प्रकृती पाहून दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला नाही. कदाचित त्यावेळी मुलावर उपचार केले जाऊ शकले असते.

आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सुभासीस साहू यांनी गुगलवर सर्च करून औषध दिल्याचा हा आरोप फेटाळून लावत ते म्हणाले की हा कोणताही वैद्यकीय बेजबाबदारपणा नाही. बालक गंभीर निमोनियाने ग्रस्त होते आणि त्याला गंभीर परिस्थितीत रुग्णालयात दाखल केले गेले होते. उपयुक्त औषधांचा वापर केला गेला होता, परंतू ते बालक शेवटच्या स्टेजवर होते.

साहू यांनी दावा केला आहे की त्यांनी रुग्णाला उमरकोट येथे नेले, परंतू त्याची प्रकृती खालावली. रुग्णाला गंभीर अवस्थेत येथे आणले होते.