‘कोरोना’सारख्या साथींवर भाष्य करतात ‘हे’ 6 सिनेमे ! अनेक माहीत नसलेल्या गोष्टींचा खुलासा करतात (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :देशात 24 मार्च 2020 पासून 21 दिवसांसाठी लॉकडाऊन लागू झाला आहे. कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळं देशभरातील लोक सध्या घरातच बंद आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीसह सारं काही थांबलं आहे. कोरोनासारख्या साथीचे रोगांवर याआधी अनेक सिनेमे आले आहेत. अशाच 6 सिनेमांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

1) व्हायरस (2019)- 2018 साली केरळमध्ये निपा व्हायरस पसरला होता. कोझिकोड आण मलप्पुरम भागात यामुळं 17 जण दगावले होते. या सत्या घटनेवर आधारीत हा सिनेमा होता. 2018 साली आलेला हा सिनेमा मल्याळम भाषेत होता. आशिक अबूनं हा सिनेमा डायरेक्ट केला होता. एकाला डोकेदुखी आणि ताप अशी लक्षणं असतात म्हणून त्यााला रुग्णालयात दाखल केलं जातं. नंतर नर्सलाच याची लागण होते. तिला श्वासच घेता येत नाही आणि मग उलगडतं कटु सत्य.

2) 28 डेज लेटर- स्लमडॉग मिलेनियर हा सिनेमा तयार करणाऱ्या डॅनी बॉयल यांनी हा सिनमाचं डायरेक्शन केलं होतं. यातील नायक कोमात असतो. 28 दिवसांनी तो कोमातून बाहेर येतो. पाहतो तर सगळं बदलेलं असतं. जिकडे तिकडे सगळं उध्वस्त झालेलं असतं. हा व्हायरस ज्याच्या संपर्कात येतो तो झोम्बी होतो. चिंपांजीमुळं हा विषाणू सगळीकडं पसरतो. फक्त चार जण यात वाचतात. अशी काही सिनेमाची स्टोरी आहे.

3) आउटब्रेक (1995)- आफ्रिकेतील जंगलात मिळालेल्या मोटाबा व्हायरसमुळं जो काही राडा होता यावर सिनेमाची स्टोरी आहे. वोल्फगँग पीटरसन यांनी हा सिनेमा डायेरक्ट केला आहे. खूप इंटरेस्टींग अशी सिनेमाची स्टोरी आहे.

https://youtu.be/fuuvllUlHCE

4) कंटेजियन (2011)- वटवाघुळ आणि डुकरांमार्फत एक व्हायरस पसरतो आणि अमेरिकेत सेंटर फॉर डिसीज अँड कंट्रोलमध्ये एली यावर लस तयार करत असते. लस घेण्यासाठी तिथं लोकांची गर्दी जमते. आता सगळ्यात पुढं काय काय होतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमा पहावा लागेल. स्टीव्हन सोडरबर्गनं हा सिनेमा डायरेक्ट केला आहे.

5) ब्लाईंडनेस (2008)- सिटी ऑफ गॉड्स आणि टू पोप्स असे सिनेमे डायरेक्ट करणाऱ्या फर्नेंडो मरिल्सनं हा सिनेमा डायरेक्ट केला आहे. यात एक मुलगा गाडी चावलतान अंध होता. तो डॉक्टरकडे जातो तर तोही आंधळा होता. अशआ प्रकारे अंधत्वाची साथ पसरू लागते. यानंतर जे काही घडतं ते पाहताना अंगावर काटा येतो.

6) द हॉट झोन (2019)- वॉशिंग्टनमध्ये एका माकडात इबोला व्हायरस आढळतो. लाख प्रयत्न करूनही हा व्हायरस सगळीकडे पसरतो. अर्थातच स्टोरी जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमाही पहावा लागणार आहे. मायकल उपेन्डाहल आणि निक मर्फी यांनी हा सिनेमा डायरेक्ट केला आहे.