‘सिरीयल किलर’ सूनेनं रचला साखळी खूनाचा कट, हत्येसाठी वापरली ‘विषारी’ पध्दत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पत्नीनेच आपल्या नवऱ्याचा आठ वर्षांपूर्वीची खून केला असल्याची धक्कदायक माहिती उघड झाली आहे. याच महिलेने आपल्या कुटूंबातील पाच जणांचा मागील 14 वर्षमध्ये खून केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या महिले सोबत आणखी दोन जणांना अटक केली आहे. केरळमधील कोझीकोड जिल्ह्यातील हा धक्कादायक प्रकार आहे.

केरळच्या क्राईम ब्रांचने एका कॅथलिक कुटूंबातील साखळी मृत्यूचा उलगडा केला आहे. 2002 ते 2016 मध्ये या कुटुंबात अनेक जणांचे मृत्यू झाले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करत चार ऑक्टोबरला परिवारातील सून जॉली आणि तिचा दुसरा पती शाजु याला ताब्यात घेतले होते.

परिवारातील 57 वर्षाच्या अनम्मा थॉमस यांचे निधन 2002 मध्ये तर त्यानंतर सहा वर्षांनी त्यांचे पती टॉम थॉमस यांचे निधन हार्ट अटॅक ने झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर 2011 साली तिसरा मृत्यू जॉली चे पती रॉय थॉमस यांचा झाला होता त्यांच्या पोस्ट मार्टममध्ये त्यांना विष दिल्याचे स्पष्ट झाले होते. 2014 मध्ये अन्नमाच्या भावाचा देखील त्याच पद्धतीने मृत्यू झाला होता. 2016 मध्ये 2 वर्षाच्या अलफोंसाचा मृत्यू हार्ट अटॅक ने झाला होता आणि त्याच्या पुढच्याच महिन्यात तिच्या आईचा देखील मृत्यू झाला होता.

त्यानंतर जॉली आणि सिलीचे पती शाजु यांनी लग्न केले आणि सासरे टॉमच्या मृत्युपत्रकानुसार कुटुंबाच्या संपत्तीवर दावा ठोकला. टॉमच्या मोठ्या मुलाने याबात क्राईम ब्रांच मध्ये तक्रार दाखल केली आणि साखळी मृत्यूच्या तपासाची मागणी केली.

यानंतर पोलिसांनी आठ वेळा जॉली आणि तिच्या पतीची चौकशी केली मात्र काहीच समोर आले नाही. त्यानंतर पोलिसांनी जॉलीचे कॉल डिटेलची माहिती काढली असता जॉली आणि शाजुची बातचीत सतत होत असल्याचे समोर आले. फॉरेंस‍िक एक्सपर्टने जेव्हा दफन केलेल्या मृतदेहांची तपासणी केली तेव्हा सर्व मृतदेहांमध्ये सायनाईड आढळून आले. त्यानंतर ही बाबा स्पष्ट झाली की सगळ्यांना सायनाईड देऊन हळू हळू मारण्यात आले आहे.

पोलिसांनी मोठी विचारपूस केल्यांनतर जॉली ने आपला गुन्हा कबूल केला आणि कुटूंबाच्या प्रॉपर्टीवर नजरं असल्याचे सांगितले. त्यासोबतच पोलिसांनी आणखी दोन जणांना ताब्यात घेतले आहे ज्यांनी साइनाईडचा पुरवठा केला होता.पोलिसांना संशय आहे की जॉलीने केवळ या एक परिवाराला फसवले नाही त्यामुळे पोलीस जॉलीच्या क्रिमिनल रेकॉडची देखील तपासणी करणार आहेत अशी माहिती केरळचे डीजीपी लोकनाथ बेहरा यांनी दिली.

Visit : Policenama.com