Coronavirus : महाराष्ट्रात ‘कोरोना’चे 6 नवे रुग्ण, संख्या 159 वर

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशाातच महाराष्ट्रात 6 नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या 159 वर गेली आहे. मुंबईत पाच तर नागपूरमध्ये एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आता 159 झाली आहे.

राज्य सरकारच्या आरोग्यखात्याने ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. घरातच थांबा, कोरोनाला रोखा असे आवाहनही करण्यात आले आहे. तरीही महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे राज्य सरकार विविध उपाययोजना करीत आहेत. राज्यातील सर्वाधिक रुग्ण मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचंवडमध्ये आहेत.