धक्कादायक ! 6 जणांनी ‘तिला’ शेतात ओढत नेलं, युवतीवर सामूहिक बलात्कार

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशातील नोयडामध्ये एका धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका युवतीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि मुलगी नोकरीच्या शोधात होती. आपला मित्र रवी याला यासंबंधी महत्वाची कागदपत्रे देण्यासाठी एका बागेमध्ये गेली होती.

त्यावेळी दोघेजण बोलत असताना त्याठिकाणी दोघाजणांनी येऊन तिच्याबरोबर छेडछाड सुरु केली. मुलीच्या मित्राच्या धमकी देत त्या ठिकाणाहून पळवून लावले. त्यानंतर अन्य साथीदारांच्या मदतीने तिला एका निर्जन शेतामध्ये नेण्यात आले. तिथे तिच्यावर या सहा जणांनी सामूहिक बलात्कार करत मारहाण देखील केली. त्यानंतर नराधमांच्या तावडीतून सुटलेल्या पीडित मुलीने पोलिसांमध्ये यासंबंधी तक्रार दाखल केली. यावेळी पोलिसांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आणि तिच्या घरच्यांना याची माहिती दिली.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असून चार जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like