मेथीच्या पाण्याने दूर होतील ’या’ 10 आरोग्य समस्या, शांत झोपेसह होतील इतर फायदे!

पोलिसनामा ऑनलाइन – मेथीची हिरवी पालेभाजी अनेकांना आवडते. याच्या बीयांचा म्हणजेच मेथीदाण्यांचा वापरसुद्धा खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. यामुळे पदार्थांची चव वाढते. या मेथीदाण्यांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. रात्री शौचाला होण्याची समस्या असल्यास मेथी खुप लाभदायक ठरू शकते. तसेच झोप न येण्याची आणि पोटदुखीची समस्याही दूर होऊ शकते.

असे तयार करा पाणी

एक चमचा मेथी 2 ग्लास पाण्यात टाकून उकळू द्या. पाण्याला मेथीचा रंग येईपर्यंत उकळवा. नंतर पाणी गाळून मेथीचे दाणे वेगळे करा आणि पाणी थंड होऊ द्या. हे पाणी कोमट झाल्यावर एक एक घोट प्या. वेगवेगळ्या समस्यांचा धोका कमी करण्यासाठी मेथीच्या पाण्याचं सेवन आठवड्यातून साधारण तीन ते चार वेळा करावा.

हे आहेत फायदे

1 कोलेस्ट्रॉल लेव्हल संतुलित राहते.

2 किडनीसंबंधी समस्या दूर होतात.

3 डायबिटीसची समस्या दूर करण्यास मदत होते.

4 हृदयासंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते.

5 केसांची काळजी घेण्यासाठी फायदा होतो.

6 फुप्फुसांसंबंधी समस्यांचा धोकाही कमी होतो.

7 मेथीच्या पाण्याने पचनक्रियाही चांगली होते.

8 पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.

9 झोप न येण्याची समस्या दूर होते. मेथीच्या पाण्याने चांगली झोप येते.

10 बद्धकोष्ठता दूर होते.