मेथीच्या पाण्याने दूर होतील ‘या’ 6 गंभीर समस्या, लागेल चांगली झोप

पोलीसनामा ऑनलाइन – मेथी आरोग्यास चांगली असते शिवाय तिची टेस्ट ही चांगली असते. परंतु, त्याचे फायदे आपल्या अनेकदा माहीत नसतात. भारतात हिरव्या पालेभाज्या आवडीने खाल्या जातात. त्यातल्या त्यात मेथीची हिरवी पालेभाजी आवडीने खाल्ली जाते. भारतातील प्रमुख मसाल्यांमध्ये मेथीच्या बियांचा वापर भाज्यांना तडका देण्यासाठी केला जातो. तसंच इतर पदार्थांमध्ये देखील त्याचा वापर केला जातो. मेथीच्या बियांने भाज्यांची किंवा पदार्थांची टेस्ट वाढते. ज्या लोकांचे पोट रात्रीदेखील साफ होत असेल त्यांच्यासाठी मेथी ही फारच फायदेशीर ठरते. मेथीच्या सेवनान पोटदुखीची समस्या दूर होऊ शकते.

मलावरोध (बद्धकोष्ठता) हा आजार सामान्य नाही. या आजारामुळे व्यक्ती हैराण होते. मेटाकुटीस येते. या त्रासापासून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर त्यासाठी खाली घरगुती उपाय दिले आहेत. त्याने आराम मिळेल.

एक चमचा मेथी २ ग्लास पाण्यात टाकून उकडू द्या. पाण्याला मेथीचा रंग येईपर्यंत हे उकडू द्या. नंतर पाणी काढून मेथीचे दाणे वेगळे करा आणि पाणी थंड होऊ द्या. हे पाणी कोमट झाल्यावर एक एक घोट घ्या. याचा लवकरच फायदा तुम्हाला दिसेल.

मेथीच्या बियांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल संतुलित राहण्यास, किडनीसंबंधी समस्या दूर करण्यासाठी, डायबिटीस नियंत्रणातराहण्यासाठी, केसांचा समस्या दूर करण्यासाठी फायदा होतो. केसांची काळजी घेण्यासाठी फायदा होतो. महत्त्वाची बाब म्हणजे मेथीच्या पाण्याने फुफ्फुसासंबंधित समस्यांचे काही प्रमाणात दूर होऊ शकतात. हे आजार आपल्याला होऊ नये म्हणून मेथीच्या पाण्याचे सेवन आठवड्यातून साधारण तीन ते चार वेळा करावे.