झोप न लागणे, बद्धकोष्ठतेसह ‘या’ 6 गंभीर समस्या दूर करतं मेथीचं पाणी ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  ज्या मेथीच्या भाजीचं तुम्ही मोठ्या आवडीनं सेवन करता त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ज्यांन रात्री शौचास येते त्यांनाही मेथीचा खूप लाभ होतो. ज्यांना झोप न येण्याची समस्या आहे किंवा ज्यांना पोटदुखीचा त्रास होतो त्यांनाही मेथीच्या बिायांचा खूप फायदा होतो. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनाही याचा खूप फायदा होतो. या वेगवेगळ्या समस्यांसाठी मेथीचा वापर कसा करावा हे आपण जाणून घेणार आहोत.

ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी असा करा मेथीचा वापर

–  एक चमचा मेथीचे दाणे 2 ग्लास पाण्यात टाकून उकळून घ्या. पाण्याला मेथीचा रंग येऊ द्या.

–  हे पाणी उकळल्यानंतर ते गाळून घ्या. त्यात टाकलेले मेथीचे दाणे वेगळे करा.

–  आता हे पाणी थंड होऊ द्या.

–  हे पाणी कोट झालं की, याचं एकेक घोटानं सेवन करा. लवकरच याचा तुम्हाला लाभ दिसेल यात शंका नाही.

मेथीचे आरोग्यास होणारे इतर फायदे कोणते ?

ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांना मेथीच्या पाण्यानं आराम मिळतोच. यामुळं इतरही अनेक फायदे होतात ते पुढीलप्रमाणे-

–  तुमची पचनक्रिया चांगली रहाते.

–  पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते.

–  काहींना रात्री झोप न येण्याची समस्या असते. अशा लोकांसाठीही मेथीचा खूप लाभ होतो. यामुळं चांगली झोप लागते.

–  कोलेस्ट्रॉल लेव्हल संतुलित राहते

–  किडनीच्या समस्या दूर होतात

–  डायिबिटीसला आराम मिळतो

–  हृदयाच्या समस्या दूर होतात

–  केसांसाठीही लाभ होतो

–  फुप्फुसासंबंधी समस्यांचा धोका कमी होतो.

किती आणि कधी कराल मेथीचं सेवन ?

वरील सर्व लाभ मिळवण्यासाठी सांगितल्याप्रमाणे मेथीच्या पाण्याचा वापर करा. आठवड्यातून साधारणपणे 3 ते 4 वेळा याचं सेवन करावं.