देशातील स्चछ शहरांमध्ये ‘या’ कारणांमुळं इंदोर चौथ्यांदा पुन्हा अव्वल ! नवी मुंबई तिसर्‍या स्थानावर, जाणून घ्या नाशिक,पुणे अन् नागपूरचा क्रमांक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशच्या इंदोर शहराशी संबंधित एक मोठी बातमी आहे. स्वच्छता सर्वेक्षण २०२० मध्ये इंदोरला देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये प्रथम स्थान मिळाले आहे. सलग चौथ्या वर्षी इंदोरने प्रथम क्रमांकाचे मानांकन जिंकले आहे. यापूर्वी २०१७, २०१८ आणि २०१९ मध्येही इंदोरला केंद्र सरकारकडून नंब र-१ स्वच्छ शहराची उपाधी मिळाली आहे. स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई तिसर्‍या तर गुजरातमधील सुरत शहर दुसर्‍या क्रमांकावर आले आहे. महाराष्ट्रातील नाशिक 11 व्या, पुणे 15 व्या तर नागपूर 18 व्या स्थानी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी स्वच्छता सर्वेक्षण २०२० चा निकाल जाहीर केला, ज्यात इंदोर शहर देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले. या क्रमवारीनंतर त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

इंदोरला प्रथम क्रमांक मिळण्याची ही आहेत ६ मुख्य कारणे
नागरिकांचा अभिप्राय – इंदोरमधील नागरिकांनी केवळ स्वच्छतेचे कौतुक केले नाही, तर त्यांच्या प्रतिसादामुळे इंदोर पुन्हा नंबर १ बनू शकले.
कचरा कपात – सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली, डिस्पोजलच्या जागी भांडी बँक आणि बॅगला पर्यायी झोला बँक सुरू केली, ५६ दुकाने व सराफा बाजार डिस्पोजल फ्री केले.
महसूल वसुली – इंदोरने कचरा व्यवस्थापन शुल्क ४० कोटी वसूल केले. हा सर्वात उंच शिखर होता, जे दुसर्‍या कोणत्याही शहराला करता आले नाही. तर भोपाळमध्येही कचरा व्यवस्थापन शुल्क १५ कोटींपेक्षा जास्त नाही.
शहरातील १६ हजार इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम स्थापित केली गेली.
घरातील ओल्या कचर्‍याचे घरातच कंपोस्टमध्ये रूपांतर करून १० हून अधिक वसाहती झिरो वेस्ट वसाहती केल्या गेल्या.
खंदकाच्या ग्राउंडमध्ये १५ लाख टन जुना कचरा काढून ६० हजाराहून अधिक रोपे लावून सिटी फॉरेस्ट तयार केले गेले.

यामुळे सुधारली भोपाळचीस्वच्छता रँक
कॅरी युअर ओन बॅग आणि कॅरी युअर ओन बॉटलच्या घोषणेने मोहीम चालवली.
शहरातील कचऱ्यासह येणारे कपडे वेगळे करून आदमपूर छावणीत त्याच्या दोऱ्या बनवल्या जात आहेत.
शहरातील भांडी बँक स्थापन करून सार्वजनिक उपक्रमात प्लास्टिकच्या डिस्पोजेबलचा वापर कमी केला.
झिरो वेस्ट कॉलनी – सलैय्या येथील इको सिटी ब्लू स्काय हायराईझ अपार्टमेंटला पालिकेने झिरो वेस्ट कॉलनी घोषित केले.
गणेशोत्सवात, दुर्गोत्सवात शहरात वापरली जाणारी फुले गोळा करून उदबत्ती बनवल्या गेल्या.

इंदोरमध्ये उत्सव सुरू
चौथ्यांदा क्रमांक १ वर आल्यानंतर इंदोरमध्ये उत्सव सुरु झाला आहे. संध्याकाळी घरोघरी दीप प्रज्वलन करुन शुक्रवारी सकाळी घरी येणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करा, असे आवाहन खासदार शंकर लालवाणी यांनी केले आहे. त्यांना हार घालून आरती करा आणि त्यांना मिठाई खायला घाला. इंदोर जिल्हाधिकारी मनीष सिंह यांनी इंदोर स्वच्छतेत सलग चौथ्यांदा प्रथम आल्यावर जनतेचे अभिनंदन केले. इंदोर महानगरपालिकेत आयुक्त असलेले जिल्हाधिकारी मनीष सिंह यांनी स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला होता.