निरोगी आणि सुखी वैवाहिक जिवनासाठी प्रत्येक मुला-मुलींनी जरूर कराव्या ‘या’ मेडिकल टेस्ट !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आनंदी व समाधानी लैंगिक आयुष्यासाठी तयारी करणंही तितकंच गरजेचं असतं. लग्नानंतर जोडीदाराला आपल्याकडून कोणतीही तक्रार असू नये किंवा लैंगिकदृष्ट्या जोडीदार असमाधानी राहू नये, असं वाटत असेल तर काही महत्त्वाच्या टेस्ट प्रत्येक मुला-मुलीने करून घेणं गरजेचं असतं.

महिलांप्रमाणाचे पुरूष हि बहुतांश वेळा लैंगिक समस्यांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे लग्नानंतरच्या जिवनावर नकारात्मक परिणाम होऊ लागतो. सांसारिक व लैंगिक आयुष्यात अडथळा निर्माण होऊ नये, असं वाटत असेल तर सुरक्षितता म्हणून प्रत्येक मुला-मुलीने लग्नाअगोदरच मेडिकल टेस्ट करून घ्याव्यात.

1) इनफर्टिलिटी टेस्ट
लग्नानंतर लैंगिक सुखासोबत आई-बाबा बनण्याचं सुख प्रत्येक जोडप्याला हवं असतं. हा योग्य आनंद वेळेत व कोणत्याही समस्येविना अनुभवायचा असेल तर लग्नाअगोदर इनफर्टिलिटी टेस्ट करून घ्या. जर तुम्हाला कोणती समस्या असेल तर लग्नाअगोदर त्यावर उपचार घेऊन ठीक होऊ शकता. लग्नानंतर या गोष्टींत वेळ वाया जाणार नाही. जर तुमची स्पर्मची संख्या कमी असेल तर तुम्ही ती संख्या वाढवू शकता.

2) जेनेटिक टेस्ट
लैंगिक समस्या या आनुवांशिक असू शकतात. याबाबत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी लग्ना अगोदर जेनेटिक टेस्ट करणं गरजेचं आहे. यामुळे तुम्हाला रोगासंबंधित माहिती मिळणार नाही तर तुम्ही आपल्या कुटुंबाच्या आरोग्याच्या इतिहासाबद्दलही माहिती जाणून घ्याल. या टेस्टमुळे तुम्ही स्वत:चाही एखाद्या आजारापासून बचाव करू शकता. शिवाय तुमच्या मुलाला याचा कोणताही त्रास होणार नाही, याचीही काळजी घेता येईल.

3) एड्स
एड्स हा एक जीवघेणा आजार आहे. एड्सची लागण संक्रमण सुई आणि त्याव्यतिरिक्त अनैतिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्यामुळे होते. याशिवाय आईला एड्स झाल्यास तो गर्भातील बाळालाही होतो. एड्स खरं तर कोणता खास आजार नसून एक लक्षण आहे. जे लक्षण शरीराला इतकं खंगवत नेतं की शरीर इतर रोगांशी लढा देण्यालायक राहत नाही. म्हणून हेल्दी सेक्स लाइफसाठी लग्नाअगोदर मुला-मुलींनी आपली एचआयव्ही टेस्ट करून घेणं गरजेचं असतं.

4) ब्लड आणि लैंगिक आजारांची टेस्ट
लैंगिक आजारांचं निदान करण्यासाठी ब्लड टेस्ट करणं आवश्यक असतं. यामुळे हिमोफिलिया आणि थैलेसिमिया यारख्या समस्यांबद्दलही समजतं. लग्नाअगोदर ब्लड टेस्ट केल्याने लैंगिक व सांसारिक जीवन सुखमय होतं. लैंगिक आजार किंवा एसटीडी ही एक सामान्य समस्या आहे. प्रायव्हेट पार्टची साफसफाई न ठेवणे, इन्फेक्शन व अनेक लोकांसोबत अनैतिक संबंध ठेवल्याने एसटीडी हा आजार होऊ शकतो. त्यामुळे लैंगिक आजार किंवा एसटीडीची तपासणी करावी.

5) मेंंटल हेल्थ चेकअप
तुम्हाला वाटत असेल की सतत स्ट्रेस येतोय किंवा अति चिंतेमुळे शांत झोप लागत नाही तर आपलं मेंटल हेल्थ चेकअप नक्की करावा. मानसिक रोगांविषयी आपल्या समाजात जास्त जागरुकता नाही, त्यामुळे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पण, तुम्ही असं करू नका आणि तातडीने मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तुम्ही भले कितीही फिट असा पण, एकदा ही टेस्ट नक्की करून घ्या. लग्नाअगोदर काही महिने ही टेस्ट करा. काही समस्या असल्यास तातडीने उपचार सुरू करू शकता.

(टीप : आपल्या ज्ञानात अधिक भर पडावी म्हणून हि माहिती केवळ आपल्याला माहित असावी म्हणून दिली जात आहे, हे आपल्या लक्षात असू द्या. याबाबत आपण वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील निर्णय आणि समज करून घ्यावेत. तसेच याबाबतच्या अधिक माहितीसाठी आपल्या वैद्यकीय तज्ञांशी संपर्क साधावा.)