जाणून घ्या : WhatsApp OTP स्कॅम म्हणजे काय ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   व्हॉट्सअ‍ॅप हे सध्याच्या काळातील एक प्रभावी माध्यम असून, ते नागरिकांच्या जीवनाचे अविभाज्य अंग बनले आहे. परंतु, हे व्हॉट्सअ‍ॅप हॅकर्सच्या निशाण्यावर असल्याचे समोर आले आहे. व्हॉट्सअ‍ॅपबाबत नवनवीन फ्रॉड करण्यात येत आहेत.

( WhatsApp OTP) स्कॅम असे त्याचे नाव असून, या माध्यमातून एखादा तुमचा मित्रच आपले व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करू शकतो, तर आज आपण त्यासंदर्भात जाणून घेणार आहोत. यामध्ये सर्वांत आधी वापरकर्त्यांना त्यांच्या एका मित्राच्या नावाने मॅसेज पाठवण्यात येतो. तुमचा मित्र अडचणीत असल्याचे त्यात म्हटले जाते. हॅकर्स अनेकदा मित्रांच्या नंबरवरून हे मॅसेज करतात.

त्यानंतर आपण हॅकर्सला उत्तर दिल्यास अजून एक मॅसेज पाठवण्यात येतो. मग तुमचा ओटीपी विचारला जाईल. चुकून हा मॅसेज तुम्हाला पाठवला असेल सांगून हॅकर तोच मॅसेज पुन्हा त्याला फॉरवर्ड करण्यास सांगेल. पण यामागचे खरे कारण म्हणजे मुद्दामून ओटीपीच्या साह्याने वापरकर्त्याचे अकाउंट हॅक करण्यासाठी हे करण्यात आले. म्हणून वापरकर्त्यांनी सावध राहिले पाहिजे.

ओटीपी कळल्यानंतर हॅकर तुमच्या नंबरवरून त्याच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यास सुरू करेल. नव्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सुरू करण्यासाठी फक्त एका ओटीपीची गरज असते. वापरकर्त्याने तो हॅकरला दिलेला असतो. त्याचाच गैरफायदा घेऊन हॅकर आपल्या मित्र परिवाराकडून त्याचसोबत नातेवाईकांकडून पैशाची किंवा त्यांना ब्लॅक करण्यासारखे प्रकार करू शकतात.

असा करू शकता फ्रॉडपासून बचाव

यासाठी सर्वांत प्रथम तुम्हाला कोणाबरोबरही कधीच आपला ओटीपी शेअर करू नका. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन ऑन करा. त्याचसोबत ओटीपीसोबत आणखी एका कोडची गरज असते. जो फक्त वापरकर्त्याकडे असतो. म्हणून समाज माध्यमात व्हायरल होणाऱ्या फेक मेसेजपासून सावधगिरी बाळगा.