‘हे’ 6 सोपे व्यायाम करून शरीरच नव्हे तर हृदय देखील ठेवा फिट !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जर तुम्ही व्यायाम करत असाल तर तुम्ही निरोगी राहता. तुमच्या हृदयाचं आरोग्यदेखील चांगलं राहतं. कारण हृदयरोगांचा थेट संबंध हा शारीरिक हालचालींसोबत असतो. आज आपण हृदय फिट ठेवण्यासाठी 6 सोप्या टीप्स आणि व्यायाम जाणून घेणार आहोत.

1) वॉकिंग – रोज वॉक केलं तरी तुम्ही फिट राहता आणि हृदयरोगांचा धोकाही यामुळं कमी होतो. रोज 30-40 मिनिटे वॉक केलं तर खूप फायदा होतो.

2) स्विमिंग – स्विमिंग हा एक उत्तम आणि परिपूर्ण व्यायाम मानला जातो. स्विमिंग केल्यानं शरीराच्या सर्वच अवयवांची एकत्रच एक्सरसाईज होते. रोज 30 मिनिटे स्विमिंग कराल तरीही फिट रहाल. ही एक्सरसाईज केली तर दुसऱ्या कोणत्याही एक्सरसाईजची गरज नाही.

3) एरोबिक्स – रोज 30 मिनिटे एरोबिक्स एक्सरसाईज केली तर तुम्हाला हृदयासंबंधी आजार होण्याचा धोका कमी होतो. जॉगिंग, रनिंग सायक्लिंग हे सारे प्रकार यातच येतात.

4) पायऱ्या चढणं – जर तुम्ही एक्सरसाईज करत नसाल तर किमान लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा. यामुळं व्यायाम होतो आणि रक्तप्रवाह देखील सुरळीत होतो. हृदय फिट राहणयास जास्त मदत होते.

5) डान्स – जर तुम्ही रोज डान्स करत असाल तर तुम्हाला दुसरी एक्सरसाईज करण्याचीही गरज नाही. हृदयासाठी हाही एक उत्तम व्यायाम आहे.

6) स्ट्रेचिंग – शरीराचे अंग जर नियमित स्ट्रेच झाले तरीही हृदय मजबूत राहतं. स्ट्रेचिंग करताना एकच काळजी घ्या ती म्हणजे शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करून नये.