नाशिकमध्ये खड्ड्यात पडून 6 वर्षीय मुलाचा मृत्यू

नाशिक : पोलिसनामा ऑनलाईन – खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक जणांचा जीव गेल्याच्या घटना आपण पाहत आणि वाचत असतो. अशाच प्रकारची एक घटना नाशिमधील कबिरनगरमध्ये घडली आहे. या ठिकाणी खड्ड्यात पडून एका सहा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. अक्षय साठे या सहा वर्षीय मुलाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अक्षय हा कबिरनगरमधील महापालिकेच्या शाळेत पहिल्या वर्गात शिकत होता. नेहमीप्रमाणे कालदेखील तो शाळेत गेला होता. मात्र शाळेत गेल्यानंतर त्याला शिक्षकांनी आधार कार्ड आणण्यासाठी घरी पाठवेल. यावेळी तो आधार कार्ड आणण्यासाठी घरी चालला असता रस्त्यात एका घराचे बांधकाम सुरू होते, त्यासाठी मोठा खड्डा खणला गेला होता. या खड्ड्यात पडून त्याचा मृत्यू झाला. या खड्ड्यात प्रचंड पाणी असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. या खड्ड्याला कोणत्याच प्रकारचे संरक्षण कुंपण नसल्याने तो या खड्ड्यात पडला.

दरम्यान, हि घटना घडल्यानंतर कुणालाही याची कल्पना नव्हती. दुपारी शाळा सुटल्यानंतर देखील तो घरी न आल्याने त्याची सर्वांनी शोधाशोध केली. त्यावेळी हि घटना उघडकीस आली. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु असल्याचे सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –