६ वर्षाच्या मुलानं ‘जोरबैठका’ काढत आई-वडिलांना मिळवून दिलं घर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – घर घेण्यासाठी किती कष्ट करावे लागतात त्याचप्रमाणे या शहरी जीवनात घर मिळणे देखील फार मोठे काम झाले आहे, मात्र रशियातील एका लहान मुलाने आपल्या कुटुंबासाठी घर मिळवले आहे. त्याने हे घर कुठे काम करून नाही तर आपल्या कौशल्याने मिळवले आहे. यासाठी त्याला फार कष्ट घ्यावे लागले. जोरबैठका काढून त्याने हे घर बक्षिसरुपात मिळवले आहे. इब्राहीम लॅनोव्ह असे त्या मुलाचे नाव असून सध्या सोशल मीडियावर आणि जगभरात त्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. या स्वरूपात घर मिळवणारा तो रशियातील दुसरा मुलगा ठरला आहे.

मात्र या घरासाठी त्याला ३ हजार २७० जोरबैठक काढण्याचा विक्रम करावा लागला. अन् त्यानंतर त्याला एक अपार्टमेंट बक्षीस म्हणून मिळाले. इतक्या मोठ्या प्रमाणात जोरबैठक एखादा फिटनेस ट्रेनर देखील काढू शकत नाही, मात्र या लहान मुलाने ते शक्य करून दाखवत हा विक्रम केला.

रशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

इब्राहीम लॅनोव्ह याने केलेल्या या विक्रमाची नोंद रशियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये केली गेली आहे. त्याने हा विक्रम केल्यानंतर त्याला तेथील स्थानिक स्पोर्टस क्लबमध्ये घर देण्यात आले. मात्र असा विक्रम करणारा हा रशियातील दुसरा मुलगा असून त्याच्याआधी एका मुलाने रेकॉर्ड करताना ४ हजार १०५ जोरबैठका काढल्या होत्या. त्यामुळे इब्राहीम लॅनोव्ह याने दुसऱ्या क्रमांकावरील रेकॉर्ड नोंदवला आहे.

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात