धक्कादायक ! ६ वर्षाच्या चिमुकल्याचा धरणात बुडवून ‘खून’

चिखली : पोलीसनामा ऑनलाइन – चार अल्पवयीन मुलांनी एका ६ वर्षाच्या मुलाला पळसखेड भट येथील धरणाच्या पाण्यात बुडवून मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी पोलिसानी अकरा, नऊ, आठ आणि दहा वर्षाच्या चार मुलांना ताब्यात घेतले आहे. मात्र, त्यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे अवघ्या सहा वर्षाच्या मुलाचा खून केला हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
बिटू मिठाईलाला चौधरी (वय ६) असे खुन झालेल्या मुलाचे नाव आहे. उत्तरप्रदेशातील काळीधाडी सरकोठा येथील तो रहिवासी आहे. सैलानी येथे त्याची आई फुलारीदेवी मिठाईलाल चौधरी (वय ३६) आणि त्याच्या दोन भावांसह तो अलिकडील काळात राहत होता.

दरम्यान, चार जून रोजी सैलानी येथीलच चौघा मुलांनी त्यास पिंपळगाव सराई-पळसखेड मार्गावर असलेल्या धरणावर नेले होते. तेथे बिट्टूला त्यांनी पाण्यात बुडवून मारले, अशी तक्रार रायपूर पोलिसांकडे करण्यात आली. त्यानंतर रायपूर पोलिसांनी अल्पवयीन चारही मुलांविरोधात खूनाचा गुन्हा पाच जून रोजी दाखल केला आहे. आता या मुलांना बुलडाणा येथे सहा जून रोजी बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या चारही अल्पवयीन व अबोध मुलांनी अवघ्या सहा वर्षाच्या बिट्टूला नेमके कोणत्या कारणावरून मारले, हे ही मुले सांगत नाही. त्यामुळे या खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

You might also like