शिक्षकी पेशाला काळीमा ! 51 वर्षीय शिक्षकाचा 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

दार्जिलिंग : वृत्तसंस्था – हैदराबाद बलात्कार प्रकरण ताजे असतानाच आणखी एक घटना उघडकीस आली आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत घडली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सरकारी शाळेतील एका 51 वर्षीय शिक्षकाने सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. प्राथमिक शाळेच्या वर्गामध्येच या शिक्षकाने दुष्कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी चंद्रमन खवस या शिक्षकाला अटक केली आहे. त्याच्यावर लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत म्हणजेच पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. आरोपी चंद्रमन याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चंद्रमनला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्गातील इतर मुले बाहेर खळत असताना या शिक्षकाने मुलीवर बलात्कार केला. मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार घरी जाऊन आईला सांगितला. आईने आधी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. मात्र मुलीला त्रास होऊ लागल्यानंतर आईचा विश्वास बसला आणि तिने पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधीत शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली.

पीडीत मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यामध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितली. दरम्यान, 20 नोव्हेंबर रोजी दार्जिलिंगमधील पॉस्को न्यायालयाने एका 39 वर्षीय व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. पाच वर्षापूर्वी त्याने एका 11 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like