पुरंदर – हवेली मतदार संघात सरासरी 60.29 % मतदान

जेजुरी :  पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीची मतदार प्रक्रिया आज पूर्ण झाली. यात पुरंदर- हवेली विधानसभा मतदार संघात सरासरी 60.29% मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले. यात मतदानाचा उत्साह मोठा होता. गेली दोन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर आज प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी पूर्ण उघडीप दिल्याने मतदानाचा टक्का चांगला झाला.

पुरंदर- हवेली विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रचारारात प्रत्येकांनी आपापल्या परीने मतदार राजाला आपलंस करण्याचा प्रयत्न केला. त्यात गेल्या दोन दिवसात जोरदार पावसाने उमेदवारांची भंबेरी उडाली. परंतु आज सोमवारी मतदार प्रक्रिया पार पडताना पावसाने उघडीप दिली. तसेही मतदार सकाळीच मतदान केंद्रावर रांगा लावून आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत होते. यावेळी या मतदार संघात काँग्रेस व शिवसेना यांच्यात सरळ लढत होत असून ही लढत चुरशीची होणार हे नक्की. आज मतदारांनी कोणाच्या पारड्यात आपले बहुमुल्य मत टाकले यासाठी दि. 24 ऑक्टोबर पर्यंत वाट पहावी लागणार आहे.