धक्कादायक ! मुंबई विमानतळावरून एकाला ‘उचललं’, पोटातून निघाल्या ‘कोकेन’नं भरलेल्या 60 कॅप्सूल
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – व्हेनेझुएलाच्या एका नागरिकाने कोकेनची तस्करी करण्यासाठी चक्क कोकेनने भरलेल्या साठ कॅप्सूल गिळल्याचे समोर आले आहे. अंमली पदार्थ तस्करी करत असल्याच्या संशयावरून या व्यक्तीला हवाई गुप्तचर विभागाने ताब्यात घेऊन त्याचा एक्सरे काढण्यात आला. एक्सरेमध्ये त्याने कोकेनने भरलेल्या ६० कॅप्सूल गिळल्याचे दिसून आले. यानंतर त्याच्यावर जे.जे. रुग्णालयात सहा दिवसांत पोटातून सर्व कॅप्सूल काढण्यात आल्या.
याप्रकरणात ब्राझीलमधील नायजेरियन तस्कराचा हात असल्याची माहिती उघड झाली असून व्हेनेझुएलन नागरिकाला अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. डेमनाईस मिगुईल टोवर सेल्स (वय-२७) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला एआययूच्या पथकाने १९ जुलै रोजी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले होत. त्याच्या पोटातून कॅप्सूल काढण्यासाठी डॉक्टरांना सहा दिवस उपचार करावे लागले.
जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी पहिल्यांदा २१ जुलैला त्याच्या पोटातून १४ कॅप्सूल काढल्या त्यानंतर सहा दिवसांत थोड्या-थोड्या अशा ६० कॅप्सूल काढण्यात आल्या. डॉक्टरांनी पोटातून कढलेल्या कॅप्सूल तपासल्या असता आतमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आढळून आली. या पावडरची तपासणी केली असता ते कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या पोटातून तब्बल ६५० ग्रॅम वजनाचे कोकेने काढण्यात आले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात दोन कोटी रुपये किंमत आहेत. हे कोकेन तो मुंबईत कोणाला देणार होता याचा तपास सुरू आहे. कोकेन तस्करीसाठी त्याला ३ हजार अमेरीकन डॉलर मिळणार होते. मात्र, त्यापूर्वीच तो पकडला गेला.
- ‘ही’ आहेत कावीळची लक्षणे, करा ‘हे’ घरगुती उपचार
- ‘Vitamin E’ ने केसांना आणि त्वचेला ‘अशाप्रकारे’ होतो फायदा
- तुमच्या बाळालाही दूध पिल्यानंतर उलट्या होत असतील तर ‘हे’ नक्की वाचा
- केसांसाठी ‘स्मूदनिंग’ का ‘स्ट्रेटनिंग’, काय चांगले आहे ते जाणून घ्या ?
- मासिक पाळीमध्ये जेव्हा तुम्हाला जास्त रक्तस्त्राव होत असेल तेव्हा ‘या’ गोष्टींचा वापर करा
- नैसर्गिक पद्धतीने कमी करा तुमच्या ‘स्तनाचा’ आकार ; जाणून घ्या
- ‘सेक्स लाईफ’मध्ये ‘वायग्रा’चा वापर करत असाल तर ‘हे’ नक्की वाचा !
- ‘दाट’ आणि ‘काळेकुट्ट’ केसांसाठी ‘हा’ उपाय करा, जाणून घ्या
- पोटाचा अल्सर बरा करण्यासाठी करा ‘हे’ उपाय
- कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दिसू शकते ‘ही’ लक्षणे