जगातील अण्वस्त्रांची संख्या घटली, पण आधुनिकतेची जोड अधिक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने जगातील एकूण अण्वस्त्रांवर अहवाल दिला आहे. या अहवालानुसार अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत व पाकिस्तान, इस्रायल, उत्तर कोरिया या देशांकडे एकूण १३,८६५ अण्वस्त्रे आहेत. या आकड्यावरून जगातील एकूण अण्वस्त्रांची संख्या गतवर्षांत कमी झाल्याचे अहवालात म्हटलं आहे.

अण्वस्त्र संख्या २०१८ च्या तुलनेत सहाशेने कमी झाली असली तरी चीन, भारत, पाकिस्तान हे देश त्यांची अण्वस्त्रांना आधुनिकतेची जोड देत आपली ताकद वाढवत आहेत, असं अहवालात म्हटलं आहे.

जगात अण्वस्त्रे कमी होत असली तरी त्यांचे स्वरूप बदलत आहे. अमेरिका व रशिया यांच्याकडे जगातील नव्वद टक्के अण्वस्त्रे आहेत. त्यांनी अण्वस्त्रांची संख्या कमी केली आहे. नवीन स्टार्ट करारावर २०१० मध्ये अमेरिका व रशिया यांनी स्वाक्षऱ्या केल्या असून त्यात सज्ज अण्वस्त्रांची संख्या कमी ठेवण्याचे बंधन आहे, असं या संस्थेच्या अण्वस्त्र नियंत्रण कार्यक्रमाचे संचालक शॉनन किली यांनी सांगितलं आहे.

तसंच स्टार्ट करार २०२१ मध्ये संपत असून त्याची मुदत वाढवण्यासाठी गांभीर्याने चर्चा करण्यात येत नाही. हे घातक असल्याचे किली यांनी म्हटले. तसच पुढील वर्षी अण्वस्त्र प्रसारबंदी करारास पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. १९८० च्या मध्यावधीत अण्वस्त्रांची संख्या ७० हजार होती, अशी माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, भारत-पाकिस्तान मधील वाढणारे वाद चिंतेची बाब आहे. दोन्ही देशांकडे अण्वस्त्रधारी देश असल्याने त्यांच्यातील पारंपरिक युद्ध हे अणुयुद्धाकडे जाऊ शकते, अशी भितीही किली यांनी व्यक्त केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

“ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय

फक्त “दारूमुळेच” जगभरात दरवर्षी ६ टक्के लोकांचा मृत्यू

“पॅरालिसिसकडे” दुर्लक्ष करू नका

या टिप्स वाचून “मानसिक” आजाराला करा बाय-बाय

“टाच” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय

सिने जगत –

‘२०२०’ मध्ये विकी कौशल आणि टायगर श्रॉफची ‘टक्‍कर’ या चित्रपटांमधून

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’