…तर कोणत्याही परिस्थितीत परत घेतले जातील PM-Kisan स्कीमचे 6000 रुपये !

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पीएम किसान स्कीममध्ये मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने सरकार सतर्क झाले आहे. या स्कीमध्ये घोटाळा करून तामिळनाडुत कोट्यवधी रूपये काढण्यात आले. यानंतर सरकारने नियम कडक केले आहे. तेथे आतापर्यंत 61 कोटी रूपय वसूल करण्यात आले आहे. यामुळे जर चुकीच्या पद्धतीने कुणी पैसे घेतलीे असतील तर त्यांच्याकडून ते वसूल केले जाणार आहेत.

चुकीच्या पद्धतीने पीएम किसान स्कीमचे पैसे घेतले असतील तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा होणार आहे. बेपर्वाई करणारे कर्मचारी आणि अधिकार्‍यांवर सुद्धा अ‍ॅक्शन घेतली जाणार आहे. या स्कीम अंतर्गत आतापर्यंत 94 हजार कोटी रूपये शेतकर्‍यांच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत.

भविष्यात या स्कीममध्ये घोटाळे होऊ नयेत म्हणून केंद्र सरकार विचार करत आहे. शिवाय खर्‍या शेतकरी कुटुंबांची ओळख पटवण्याचे काम राज्य सरकारांचे असणार आहे.

मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थी
तमिळनाडुत आतापर्यंत 5.95 लाख लाभार्थ्यांच्या खात्याची चौकशी झाली आहे, ज्यापैकी 5.38 लाख खाती बोगस निघाली आहेत. याचा अर्थ अतिशय मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. या बोगस लोकांकडून आता ही रक्कम वसूल केली जात आहे.

तमिळनाडुत 96 काँट्रॅक्ट कर्मचार्‍यांची सेवा या प्रकरणात समाप्त करण्यात आली आहे. अपात्र लाभार्थ्यांच्या रजिस्ट्रेशनसाठी जबाबदार असलेल्या 34 अधिकार्‍यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. 3 ब्लॉक स्तरीय अधिकारी आणि 5 सहायक कृषी अधिकार्‍यांना सस्पेंड केले आहे.

हे लोक पासवर्डचा दुरुपयोग करण्यात जबाबदार आढळले. 13 जिल्ह्यांत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तर 52 लोकांना अटक केली आहे.

कसा केला घोटाळा?
घोटाळे बाजांनी स्कीम अंतर्गत काही अपात्र व्यक्तींची मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यासाठी जिल्हा अधिकार्‍यांच्या लॉगइन आयडी आणि पासवर्डचा दुरूपयोग केला होता. कृषी विभागने कंत्राटी पद्धतीने ठेवलेले कर्मचारी यामध्ये दोषी आढळले आहेत.

पीएम किसान स्कीमचा लाभ कुणाला मिळणार आणि कुणाला नाही
– असे शेतकरी जे भूतकाळात किंवा सध्या संविधानिक पदावर आहेत, माजी अथवा सध्याचे मंत्री, मेयर, जिल्हा पंचायत अध्यक्ष, आमदार, एमएलसी, लोकसभा आणि राज्यसभा खासदार शेतकरी असले तरी या योजनेच्या बाहेर समजले जातील.

– केंद्र किंवा राज्य सरकारचे अधिकारी आणि 10 हजारपेक्षा जास्त पेन्शन घेणारे शेतकरी लाभ घेऊ शकत नाहीत.

– नोकरदार, डॉक्टर, इंजिनियर, सीए, वकील, आर्किटेक्ट लाभ घेऊ शकत नाहीत.

– मागच्या आर्थिक वर्षात इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी लाभ घेऊ शकत नाहीत.

– केंद्र आणि राज्य सरकारचे मल्टी टास्किंग स्टाफ/चतुर्थ श्रेणी/समूह डी कर्मचारी यांना लाभ मिळेल.
जरी कुणी प्राप्तीकर भरणार्‍या याचा लाभ घेतला जरी असेल तरी तो तिसरा हप्ता घेताना पकडला जाणार आहे. तसेच इतर लोकांवरही आता बारीक लक्ष असणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like