Coronavirus : पुणे विभागात ‘कोरोना’चे 6029 रूग्ण तर 2927 बाधित उपचारानंतर झाले बरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे विभागातील 2 हजार 927 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 हजार 29 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 2 हजार 807 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 295 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 197 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 5 हजार 14 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 552 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 212 आहे. कोरोनाबाधित एकूण 250 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 190 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये पुणे जिल्ह्यात297, सातारा जिल्ह्यात 20, सोलापूर जिल्ह्यात 46, सांगली जिल्ह्यात 3, कोल्हापूर जिल्ह्यात 49 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील 201 कोरोना बाधीत रुग्ण असून 106 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 90 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 524 कोरोना बाधीत रुग्ण असून 218 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 269 आहे. कोरोना बाधित एकूण 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील 62 कोरोना बाधीत रुग्ण असून 38 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 23 आहे. कोरोना बाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 228 कोरोना बाधीत रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 213 आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 65 हजार 551 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 56 हजार 445 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 9 हजार 149 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 50 हजार 314 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 6 हजार 29 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 1 कोटी 25 लाख 14 हजार 145 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 5 कोटी 38 लाख 59 हजार 124 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 3 हजार 584 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like