2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नि: शस्त्र पोलीस उपनिरीक्षक PSI पदी पदोन्नती देण्यासाठी विभागीय अर्हता परीक्षा Examination – २०१३ मधील पात्र असलेल्या ६१९ पोलीस हवालदारांना सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर पीएसआयपदी PSI बढती देण्यात आली आहे. यात मुंबई पोलीस आयुक्तालयातील ३१८ पोलीस अंमलदारांची पदोन्नती रखडली होती. विशेष पोलीस महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी याबाबतचे आदेश काढला आहे.

शरद पवारांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस थेट एकनाथ खडसेंच्या घरी, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

पोलीस हवालदार व सहायक पोलीस उपनिरीक्षक यांची पोलीस उपनिरीक्षक PSI पदासाठी शासनाने २०१३ मध्ये खात्यामार्फत विभागीय अर्हता परीक्षा घेतली होती. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पोलीस हवालदारांना पोलीस उपनिरीक्षक पदाची पदोन्नती देण्यासाठी जानेवारी २०१९ मध्ये यादी प्रसिद्ध केली होती. मात्र, या यादीप्रमाणे पोलीस कर्मचार्‍यांना पदोन्नती दिली नाही. त्यानंतर शासनाने ८७५ पोलीस उपनिरीक्षक पदाची रिक्त पदे भरण्यासाठी पोलीस महासंचालकांना नोव्हेंबर २०१९ मध्ये लेखी पत्र दिले होते. या पत्रानुसार, पोलीस महासंचालक कार्यालयाने पदोन्नतीची प्रक्रिया सुरु करुन जून २०२० मध्ये माहिती मागविली होती. मात्र, त्यात काही वरिष्ठ अधिकार्‍यांनी शंका उपस्थित करुन नवीन पत्रव्यवहार केला. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस हवालदार परीक्षा Examination उत्तीर्ण होऊनही पदोन्नतीपासून वंचित राहिले होते. त्यातील अनेक जण वयोमानानुसार सेवानिवृत्त देखील झाले आहेत.

पदोन्नती मिळालेल्या सर्व अंमलदारांनी त्यांची वयाची ५० वर्षे ओलांडलेली आहे. त्यातील ९० टक्के अंमलदार हे नजीकच्या २ ते ५ वर्षांच्या कालावधीत वयोमानाने सेवानिवृत्त होणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या साथीत त्यांना ते सध्या ज्या घटकामध्ये आयुक्तालय/ अधीक्षक कार्यालयात कार्यरत आहेत. त्याच ठिकाणी पदोन्नती देण्यात आली आहे. या नवीन पोलीस उपनिरीक्षकांना १५ दिवसांचा प्रशिक्षण कोर्सचे नियोजन करण्यात आले आहे.

Gold-Silver Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड तेजी, Gold 50000 रूपयांच्या जवळ तर Silver 72 हजारांवर

Health in Your Hands : Corona सह गंभीर आजारांचा संकेत देतात तुमचे हात, असा घ्या शोध

Pune : पोलिसांच्या गुन्हे शाखेतील कर्मचारी आणि त्याच्या भावाकडून Covid केअर सेंटरमधील डॉक्टरला चौकीत घुसून मारहाण, प्रचंड खळबळ

Coronavirus Vaccination : कोविड-19 व्हॅक्सीनच्या साईड-इफेक्ट्सपासून आराम देऊ शकते का नारळपाणी?, जाणून घ्या

नारायण राणेंची मराठा समाजासाठी मागणी, म्हणाले – ‘3 हजार कोटींचे पॅकेज द्या’

केमिकल टँकर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण आग लागून दोघांचा होरपळून मृत्यू