धक्कादायक ! भारतात तब्बल 62 % महिला ॲप्सच्या माध्यमातून करतात Sexting !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ॲप्सच्या वापरासंदर्भात करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. भारतात तब्बल 19 टक्के महिला या ॲप्सचा वापर डेटींग पार्टनर्स शोधण्यासाठी करत आहेत. त्या दीर्घकाळ किंवा शॉर्ट टर्म रिलेशनसाठी पार्टनर शोधतात. जगाचा विचार करता हा दर 21 टक्के एवढा आहे.

याच संशोधनातून आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्या तब्बल 62 टक्के महिला सेक्सटींगचा अथवा सेक्स टेक्सटींगचा वापर करतात. म्हणजेच त्या सेक्सी फोटो किंवा मेसेजेस आपल्या मोबाईलवरून दुसऱ्याला पाठवतात. रुचिका उनियालच्या रिपोर्टमधून ही गोष्ट समोर आली आहे.

ऑनलाईन प्रश्नांच्या आधारे संशोधन

हे संशोधन जर्नल प्लोस वनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या संशोधनात 191 देशांच्या महिलांनी भाग घेतला होता. यात एकूण 1,30,885 महिलांचा समावेश होता. यापैकी 23,093 महिला या भारतातील होत्या. या संशोधनात महिलांनी ऑनलाईन प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

सेक्सटींग करणाऱ्या महिलांचं प्रमाण चौपट

या सर्वेक्षणादरम्यान महिलांनी दिलेल्या उत्तरांचा अभ्यास केल्यानंतर ज्या देशात महिलांसोबत लैंगिक असमानतेचे प्रमाण अधिक आहे अशा देशात सेक्स पार्टनरचा शोध घेण्यासाठी मोबाईलचा वापर कमी प्रमाणावर होतो. मात्र या देशातील महिला मोठ्या प्रमाणावर सेक्सटींग करतात आणि हे प्रमाण जवळपास चारपट अधिक आहे.

21 ते 24 वर्षांच्या आतील महिला करतात ॲप्सचा सर्वाधिक वापर

या संशोधनातील आकडेारीचा विचार करता 4362 म्हणजे जवळपास 19 टक्के महिलांनी मान्य केलं आहे की, त्या पार्टनर शोधण्यासाठी मोबाईल ॲप्सचा वापर करतात. यात 18 ते 54 वर्षांच्या महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या वयोगटात डेटींग ॲपचा वापर करणाऱ्या महिलांमध्ये 21 ते 24 वर्षांच्या महिलांचे प्रमाण अधिक आहे. मात्र ज्या महिला पार्टनर शोधतात त्यापैकी 29 टक्के महिलांनी सांगितलं की, त्या केवळ एन्जॉयमेंटसाठी पार्टनर शोधतात.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like