६२ वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्री रीटा भादुरी यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

हिंदी चित्रपट सृष्टीत मोलाची कामगिरी केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आज दुपारी 12 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अभिनेता शिशिर शर्मा यांनी आपल्या फेसबुक पेजवर रिटा भादुरी यांच्या निधनाबाबतची माहिती दिली.

[amazon_link asins=’B07F83WRJS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9353699d-897b-11e8-abe6-63b9bc86b8ab’]

रिटा भादुरी यांनी हिंदी सिनेमात दादीच्या अनेक भूमिका केल्या आहेत. त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९५५ मध्ये उत्तरप्रदेश लखनऊ येथे झाला. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्याची १९७७ मध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली. त्यांचा पहिला हिंदी चित्रपट ‘जुली’ हा होता. पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन संस्थेच्या त्या १९७३ च्या बॅचच्या विद्यार्थीनी होत्या. त्यांच्याबरोबर झरिना बहाव याही त्यावेळी संस्थेत होत्या. रिटा भादुरी यांची बिहार आणि महिला सशक्तीकरणावरील आधारित ‘निमकी मुखिया’ या मालिकेतील दीदीची भूमिका चांगलीच गाजली होती. २००५ साली ‘कोई मेरे दिल में है’, हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. त्यांनी मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ, मुलाकात, दिल विल प्यार व्यार, कितने दूर कितने पास, क्या कहना, होते होते प्यार हो गया, विरासत, राजा, आतंक ही आतंक, आशिक आवारा, सावन को आने दोन, गहराई, बेटा, कभी हाँ कभी ना अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी भूमिका केल्या होत्या. यांनी स्वतःची अनेक पुस्तके लिहली आहेत. आशा, आशा की माँ, गायत्री हि पुस्तके लिहली आहेत. साराभाई वर्सेस साराभाई, कोई दिल मे है, हद कर दी, थोडा है थोडे की जरुरत है, अमानत अशाअनेक टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी चरित्र भूमिका केल्या होत्या.