चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ होर्डींग कोसळून एक ठार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चर्चगेट रेल्वेस्थानकाजवळ एका ६२ वर्षांच्या पादचाऱ्याच्या अंगावर होर्डींग कोसळल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास घडली.मधुकर अप्पा नार्वेकर (वय ६२) असे मयताचे नाव आहे.

आज दुपारी पावणे एकच्या सुमारास नार्वेकर हे चर्चगेट रेल्वे स्टेशन पासून जात होते,. त्यावेळी अचानक एक होर्जींग त्यांच्या अंगावर कोसळले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथं त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु कऱण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. होर्डींगचा काही भाग अंगावर कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले. मात्र होर्डिंगचा भाग कशामुळे कोसळला याचे काऱण अद्याप समजले नाही.

स्कायवॉकच्या मेटल शीट कोसळून महिला जखमी

वांद्र्यातील एस. व्ही. रोड येथे स्कायवॉकवरची मेटल शीट अंगावर पडून ३ मुली जखमी झाल्या. मेलीसा नजारत, सुलक्षणा वझे, तेजल कदम अशी जखमी महिलांची नावं आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

फिट राहण्यासाठी दीपिकाचा नवीन फंडा

तांब्याची बॉटल खरेदी करताना घ्या ही काळजी

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘गुगल मॅप्स’ आणणार नवीन ‘अ‍ॅप’

रूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’

Loading...
You might also like