CAA विरोधातील आंदोलनात PM मोदींबद्दल ‘अपशब्द’, झाली ‘अटक’

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल नागरिकत्व कायदा विरोधी आंदोलना दरम्यान अवमानकारक भाषा वापरल्याने एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी हि कार्यवाही केली असून शेख गनी शेख रहमान (वय ६२) असं अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकत्व कायदा विरोधी आंदोलन करण्यात आले.

याच आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केलेला व्हिडीओ व्हायरल झाला.याबाबत स्थानिक भाजपच्या नेत्याने तक्रार दिली. व्हायरल व्हिडीओ पाहून शेख गाणी शेख रेहमान याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

कायद्याविरोधात धरणे आणि समर्थन रॅली
दिल्लीत शाहीन बाग आणि मुंबईतही महिलांचे बेमुदत नागरिकत्व कायद्याविरोधात धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनांना पाठिंबा देण्यासाठीच ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. एकीकडे सीएए विरोधी आंदोलन होत असताना सीएए समर्थनासाठी विविध संघटना समर्थन रॅलीचे आयोजन करत आहे.