62 वर्षीय डॉक्टरची प्रेयसी 55 वर्षाची, दोघं कारमध्ये भेटले अन्…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कार रस्त्याच्या कडेला उभी करून डॉक्टर प्रियकर आणि त्यांची प्रेयसी गाडीत भेटले. 62 वर्षीय डॉक्टरने आपल्या 55 वर्षीय प्रेयसीचा गोळ्या झाडून खून केला. तसेच स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी घडली असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. ओमप्रकाश कुकरेजा (वय-62) आणि सुदीप्ता दत्ता मुखर्जी (वय-55) असे मृत प्रेमी जोडप्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या रोहिणी भागात एका कारमध्ये रक्ताने माखलेले दोन मृतदेह असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. कारची पाहणी केली असात आतमध्ये डॉक्टर आणि त्याच्या महिला मैत्रिणीचा मृतदेह पोलिसांना आढळून आले. गोळी घालून दोघांचा खून करण्यात आला होता. पोलिसांना गाडीमध्ये परवाना असलेली पिस्तूल सापडली आहे.

डॉ. ओमप्रकाश कुकरेजा यांनी आपल्या प्रेयसी सुदीप्ता मुखर्जी यांचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. कुकरेजा यांनी कोणत्या कारणासाठी सुदीप्ती मुखर्जी यांचा खून करून आत्महत्या केली हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com

 

Loading...
You might also like