चिनी पुरुषांना का पाहिजेत पाकिस्तानी मुली ? दोन्ही देशांच्या सीमेवर ‘हे’ रॅकेट ‘अ‍ॅक्टिव्ह’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेकडो पाकिस्तानी मुली चीनच्या पुरुषांना विकण्यात आल्या आहेत. यासाठी त्यांना पाकिस्तानातून चीनमध्ये आणण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानातून 629 मुली, महिलांना आणि मुलांना, पुरुषांना नवरी बनवून विकण्यात आले आहे. पाकिस्तानातील गरीब आणि वंचित महिलांना चिनी पुरुषांसाठी फसवले जात आहे.

2018 नंतर अशा प्रकारच्या तस्करीमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी महिलेच्या संख्यांबाबत एक आकडेवारी समोर आली आहे. जून महिन्यात चीन आणि पाकिस्तानमधील याबाबतचे एक रॅकेट समोर आल्याने माहिती उघड झाली होती. तपास अधिकाऱ्यांच्या मते दोनीही देशातील संबंध खराब होऊ नहेत यासाठी तपास अधिकाऱ्यांवर दबाव असतो.

ऑक्टोबर महिन्यात अशा प्रकारच्या महिला तस्करीच्या बाबतीत फैसलाबाद मधील एका न्यायालयाने निर्णय देत 31 चिनी नागरिकांना सोडून दिले होते. मिळलेल्या माहितीनुसार यातील महिलांनी पुन्हा साक्ष देण्यास नकार दिला होता.

या सर्व प्रकारातून अनेक महिलांना वाचवणाऱ्या एका सलीम इकबाल नावाच्या कार्यकर्त्याने सांगितले की, याबाबत काम करणाऱ्या केंदीय तपास यंत्रणेने अधिकाऱ्यांवर दबाव बनवायला सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील करण्यात आल्या आहेत. जेव्हा आम्ही पाकिस्तानसोबत याबाबत बोलतो तेव्हा ते आमच्याकडे अजिबात लक्ष देत नाही.

एवढेच नाही तर पाकिस्तानी मीडियावर देखील अशा प्रकारच्या महिला तस्करीच्या बातम्या देण्यावर देखील बंदी लादण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या मुलींसाठी कोणीही मदत करायला तयार नाही. खुले आम हे रॅकेट सुरु आहे मात्र कोणताही अधिकारी दबावामुळे यावर कारवाई करणार नाही.

चीनच्या परराष्ट्रीय मंत्रालयाने सांगितले की, आम्हाला अशा कसल्याही प्रकाराबाबत माहिती नाही. तसेच चीन आणि पाकिस्तानचे सरकार आपल्या लोकांमध्ये कौटुंबिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

पाकिस्तानमधील इसाई समाजातील मुलींना दलाल आपल्या तावडीत अडकवतात आणि त्यांच्या आई वडिलांना स्वतःच्या मुलींसाठी श्रीमंत चिनी जावई मिळवून देण्याचे आमिष दाखवतात आणि अनेक पाकिस्तानी महिला चिनी पुरुषांसोबत लग्न करतात. चिनी व्यक्तीकडून या महिलांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले जाते. इसाई हा समुदाय अत्यंत गरीब समजला जातो. त्यामुळे तस्करीसाठी त्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जातो.

या रॅकेटमध्ये चिनी पाकिस्तानी आणि काही इसाई दलाल देखील सामील असतात. गरिबांनी आपल्या मुली विकाव्यात यासाठी हे दलाला अनेक प्रकारचे लालच त्यांच्या घरच्यांना दाखवतात. यामध्ये एक मौलवी देखील मदरसामध्ये मॅरेज ब्युरो चालवत आहे. तपासणी करणाऱ्यांकडे 629 महिलांच्या यादीमध्ये चिनी पतींची नावे देखील आहेत आणि त्यांच्या लग्नाची तारीख देखील त्यामध्ये दिलेली आहे. 629 या महिलांना त्यांच्याच कुटुंबाने चिनी पुरुषांना विकले आहे.