सावधान ! भारतात ‘कोरोना’ व्हायरसमुळं झालेले 63 % मृत्यू ‘या’ वयोगटातील, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव भारतातमध्ये वाढण्यास सुरुवात झाली आहे. भारतात आतापर्यंत 4281 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, तर 111 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये वृद्ध लोक जास्त आहे. भारतात, 60 वर्षापेक्षा जास्त असलेले 19 टक्के वृद्ध लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची नोंद आहे, त्यापैकी 63 % वृद्ध लोक कोरोना विषाणूपासून आपला बचाव करु शकले नाही त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 30% लोकांमध्ये 40-60 वयोगटातील आहेत. अशामध्ये केवळ 7% रुग्ण आढळले आहेत, ज्यांचे वय 40 किंवा त्यापेक्षा कमी आहे. मंत्रालयाने दिलेली आकडेवारीने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, यावेळी सर्वात जास्त धोका मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय आणि मूत्रपिंड ग्रस्त रूग्णांना आहे.

कोविड -19 मध्ये संक्रमित रूग्ण आणि मृतांच्या विश्लेषणाने असे सिद्ध केले आहे की, पुरुषांमध्ये हा संसर्ग अतिसंवेदनशील बनला आहेत. आतापर्यंत संक्रमित रुग्णांपैकी 76% पुरुष आणि 24% महिला आहेत. मृतांविषयी बोलायचे म्हणले तर, 73% पेक्षा जास्त मृत्यू पुरुषांमध्ये झाले आहेत तर 27% स्त्रिया कोरोना विषाणूच्या संसर्गाने मरण पावल्या आहेत. संसर्गाच्या प्रमाणाबद्दल बोलायचे म्हणले तर, ते 3.1 आहे.

24 तासांत 693 नवीन प्रकरणे समोर आली आहे, त्याचबरोबर 30 लोकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी Covid-19 चे एकूण 4,067 प्रकरणांची पुष्टी झाली. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 109 लोकांचा मृत्यू झाला आहे. असे म्हटले जाते की, गेल्या 24 तासात 693 नवीन घटना घडल्या आहेत तर 30 लोकांचा मृत्यू झाला आहे.

You might also like