भाजप खा. गांधींसह 64 राजकीय नेतेमंडळीचे शस्त्रपरवाने निलंबित

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – फौजदारी गुन्हे दाखल असल्याने खासदार दिलीप गांधी, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अनेक जिल्हा परिषद सदस्यांसह तब्बल 64 राजकीय व्यक्तींच्या शस्त्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. पोलिसांच्या अहवालावरून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळे अनेक बड्या नेत्यांना चांगलाच दणका बसला आहे.

शस्त्रपरवाने निलंबित झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे:-
नगर शहर व तालुका-
खा. दिलीप गांधी, अंबादास गारुडकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सुनील डहाळे, अभिजित कोतकर, दीपक सिद्धवरम सुब्रमण्यम, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, बापूसाहेब पालवे, रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी लॉरेन्स स्वामी, पोपट मोरे, जिल्हा परिषद सदस्य माधव लामखडे.
नेवासे – नानासाहेब तुवर, अशोक रामचंद्र गायकवाड, भाऊसाहेब मोटे.
श्रीरामपूर – शैलेश बाबरिया, श्यामलिंग शिंदे.
संगमनेर- भानुदास ढेरे.
पाथर्डी – राष्ट्रवादीचे नेते प्रताप बबनराव ढाकणे, दिनकर पालवे.
श्रीगोंदे- श्यामराव नागवडे, लक्ष्मण बोरुडे, खंडू कोळपे, तुळशीराम रायकर,
पारनेर : राहुल शिंदे, तान्हाजी इकडे, दादाभाऊ थोरात, काशिनाथ राठोड, खोडा ठोंबरे, दौलत पांढरकर, गजानन औटी, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित वसंतराव झावरे, प्रभाकर रोहोकले, मधुकर उचाळे, संभाजी रोहोकले, शंकर नगरे. कोपरगाव- अशोक रोहमारे, बाळासाहेब जगताप, नितीन औताडे, जयंत रोहमारे.
राहाता- नितीन कोते, नीलेश कोते.
जामखेड- दिलीप बाफना, हनिफ शेख, अंकुश ढवळे, किसन ढवळे.
कर्जत – बळीराम यादव, प्रसाद ढोकरीकर, सुरेश सांळुके, अंबादास पिसाळ, लालासाहेब सुद्रीक, शांतीलाल कोपनर, मधुकर कोपनर, बाळासाहेब देशमुख, कैलास शेवाळे, पोपट गांगडे, प्रकाश भंडारी, पोपट अनभुले, गुलाब तनपुरे, मुबारक बादशाह मोगल, माणिकराव लोंढे, संभाजी भोसले, नितीन भोसले, शिवाजी पांडुळे, अविनाश दोषी.