Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6497 नवे पॉझिटिव्ह तर 193 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात दररोज सहा हजारांच्या पुढे कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्याने राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. वाढती कोरोना बाधितांच्या संख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 6497 नवीन कोरोना बाधितर रुग्णांची नोंद झाली आहे. तर 193 जणांचा मृत्यू झाला आहे.


राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासात 6497 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 193 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 60 हजार 924 इतकी झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 19.43 टक्के आहे. तर राज्यातील मृत्यूचे प्रमाण 4.02 टक्के इतके आहे.

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासात राज्यामध्ये 4182 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत राज्यात 1 लाख 44 हजार 507 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.38 टक्के इतके आहे. तर राज्यात सध्या 1 लाख 5 हजार 637 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या 6 लाख 87 हजार 353 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 41660 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.