राजस्थान : आयआयटी जोधपूरमध्ये 70 विद्यार्थी पॉझिटिव्ह

जोधपूर : राजस्थानमधील आयआयटी जोधपूरमधील वसतीगृहात राहणार्‍या ७० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रॉक्टिकल देण्यासाठी विद्यार्थी सध्या वसतीगृहात आले आहेत.

आयआयटी जोधपूरच्या कॅम्पसमधील ब्लॉक जी ३ हा मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री पी. सिंह यांनी दिली.

आयआयटी, जोधपूरच्या ११ वसतिगृहाच्या इमारती आहेत. या विद्यार्थ्यांना प्रॉक्टिकलसाठी महाविद्यालयात बोलविण्यात आले आहे. पॉसिटिव्ह आलेले हे विद्यार्थी प्रामुख्याने गुजरात चंदीगड, आणि जयपूर येथून आले आहेत.

आय आयटी जोधपूरचे प्रवक्ते अमरदीप शर्मा म्हणाले की आम्ही घरुन येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला मुख्य प्रवेशद्वारातूनच नियुक्त केलेल्या वेगळ्या वॉर्डामध्ये नेत आहोत. तेथे लक्षणे असणार्‍या या विद्यार्थ्यांचे स्वॅब घेण्यात आले. त्यांना चाचण्यांसाठी एम्सकडे पाठविले गेले. जे विद्यार्थी पॉसिटिव्ह आढळून आले. त्यांना आम्ही थेट विलगीकरण वॉर्डात पुढील १४ दिवसांसाठी ठेवत आहोत.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जोधपूरचे विभागीय आयुक्त राजेश शर्मा आणि उपसंचालक (वैद्यकीय व आरोग्य) सुनिल कुमार बिष्ट यांनी कॅम्पसला भेट दिली आणि आयआयटी प्रशासनाने घेतलेल्या परिस्थिती व व्यवस्थेचा आढावा घेतला.