65 वर्षाच्या व्यक्तीने पत्नीला लिहीलं होतं 8 KG चं Love Letter, जाणून घ्या या अनोख्या प्रेमवेड्याची कहानी

मेरठ : पोलीसनामा ऑनलाइन – ये मेरा प्रेम पत्र पढकर कि तुम नाराज ना होना, हे गीत ऐकून मेरठच्या एका प्रेमवेड्याने इतके मोठे प्रेमपत्र लिहिले की, त्याची पत्नी खरोखरच नाराज झाली. मात्र, नंतर त्यांनी आपल्या पत्नीला संपूर्ण गोष्ट सांगितली, तेव्हा पतीने केलेले हे काम पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. मेरठ जिल्ह्यात राहणारे जीवन लाल बिष्ट यांनी लिहिलेले प्रेमपत्र आजसुद्धा जगातील सर्वोत्तम प्रेमपत्रांमध्ये सहभागी आहे.

8 किलोच्या प्रेमपत्रात मांडले संपूर्ण जीवन
जीवन लाल बिष्ट यांच्या या प्रेमपत्राबाबत जाणून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. 8 किलोच्या या प्रेमपत्रात जीवन यांनी आपल्या पत्नीसमोर पुस्तकाप्रमाणे आपले संपूर्ण जीवन खुले केले आहे. तसेच, या प्रेमपत्रात तत्कालीन सामाजिक आणि राजकिय मुद्देसुद्धा प्रामुख्याने मांडले आहेत. जीवन सिंह बिष्ट सरकारी विभागातून रिटायर झालेले कर्मचारी आहेत. सध्या त्यांचे वय जवळपास 65 वर्षांचे आहे. जीवन यांची पत्नी कमला सुरूवातीपासून उत्तराखंडमध्ये राहिली आहे.

कारगिल युद्ध आणि उडीसा दुर्घटनेचा सुद्धा उल्लेख
पत्नीवर अपार प्रेम करणारे जीवन आणि त्यांची पत्नी कमला यांच्यामध्ये अनेक वर्षांपूर्वी एक छोटासा वाद झाला होता. ज्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला खुश करण्यासाठी एक आगळवेगळा मार्ग निवडला. 2000 मध्ये जीवन यांनी आपल्या पत्नीला एक प्रेमपत्र लिहिण्यास सुरूवात केली. या प्रेमपत्रात आपल्या जीवनाची सर्व पाने पत्नीसमोर खुली केली. तर, त्यावेळी सुरू असलेल्या कारगिल युद्ध आणि उडीसा दुर्घटनेची सुद्धा सविस्तर माहिती पत्रात लिहिली.

वजन 8 किलो, लिहिण्यासाठी लागले 2 महीने
परिणामी पत्र लिहिता-लिहिता त्याचे वजन 8 किलो झाले आणि ते लिहिण्यासाठी जवळपास 2 महीने लागले. जीवन सांगतात त्याकाळी हे पत्र पोस्ट करण्यासाठी त्यांचे 700 रुपये खर्च झाले होते. परंतु, इतक वजनदार पत्र पाहून त्यांची पत्नी त्यांच्यावर आणखी नाराज झाली. यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला सर्व गोष्ट सांगितली, तेव्हा पतीने केलेले हे काम पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. जीवन यांच्या जीवनाबाबत बोलायचे तर त्यांना आगळीवेगळी कामे करण्याचा छंद आहे.

समाजाला व्यसनमुक्त करण्याची केली प्रतिज्ञा
जीवन यांच्याकडे एकापेक्षा एक पोस्टाच्या तिकिटांचा संग्रहसुद्धा आहे. सर्वात वजनदार मुळा आणि वांगे पिकवण्याचा सुद्धा विक्रम जीवन यांनी केला आहे. जीवन सांगतात की, या कामासाठी त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे. त्यांची पूर्ण खोली विक्रमांनी भरलेली आहे. सध्या जीवन हे समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी काम करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like