खळबळजनक ! पुण्यात वृध्दाकडून ६६ वर्षीय पत्नीचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वानवडी परिसरात रहावयास असलेल्या वृध्दाने ६६ वर्षीय पत्नीचा खून केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. आजारपणाला कंटाळून पत्नीचा खून करून वृध्द पती बेपत्‍ता झाल्या असून त्याला शोधण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीला नेमका कुठला आजार होता याबाबत अद्याप माहिती मिळाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

दविंद्र कौर बिंद्रा (६६) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा पती हरविंदर (७७) यांचा पोलिस शोध घेत आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पतीच्या आजारपणाला हरविंदर कंटाळले होते. त्यामुळेच त्यांनी त्यांचा खून केला असावा अशी माहिती समोर आली आहे. खूनाबाबत माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह इतर अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वानवडी पोलिस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like