6,6,6,6,2,6,4 : रवींद्र जडेजाचे वादळ, हर्षल पटेलच्या एका ओव्हरमध्ये धु-धु धुतले, विराट कोहली ‘हैराण’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आयपीएलच्या 19व्या सामन्यांतर्गत रविवारी खेळवण्यात आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेगळुरूमधील मॅचमध्ये सीएसकेचा ऑल राऊंडर रवींद्र जडेजाने धडाधडा धावा काढल्या. जडेजाने धावांचे असे वादळ आणले की आरसीबीचा कर्णधार विराट कोहली पहातच राहीला.

जडेजाने 20व्या ओव्हरमध्ये हर्षल पटेलच्या चार चेंडूवर 4 षटकार ठोकले. जडेजाने हर्षलला असे झोडपले की, तो क्वचितच हे विसरू शकेल. जडेजाचे जेव्हा दोन षटकार मारून झाले होते, तेव्हा हर्षलची लय बिघडली, त्याने तिसरा चेंडू नो बॉल टाकला, ज्याचा जडेजाने भरपूर फायदा घेत त्यावर षटकार ठोकला. यानंतर दुसर्‍यांदा टाकलेल्या चेंडूवर जडेजाने पुन्हा एकदा षटकार ठोकला.

चौथ्या चेंडूवर जडेजाने दोन धावा घेतल्या. पााचव्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार मारला. सहाव्या चेंडूवर त्याने शानदार चौकार मारला. अशाप्रकारे जडेजाने हर्षलच्या या ओव्हरमध्ये 37 धावा लुटल्या.

त्याने 28 चेंडूवर 5 षटकार, 4 चौकार ठोकून 221 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने नाबाद 62 धावा बनवल्या. जडेजाच्या या खेळीची क्रिकेटच्या क्षेत्रात जोरदार चर्चा आहे.