66 वा नॅशनल फिल्म अवॉर्ड्स : अभिनेता आयुष्मान खुराना आणि विक्की कौशलला नॅशनल अवॉर्ड ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 66 व्या नॅशनल फिल्म अवॉर्ड्समध्ये बॉलिवूड स्टार आयुष्मान खुरानाला अंधाधुनसाठी बेस्ट अ‍ॅक्टर म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. तर अभिनेता विक्की कौशलला उरी : द सर्जिकल स्ट्राईक सिनेमासाठी बेस्ट अ‍ॅक्टर म्हणून नॅशनल अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं आहे. यशिवाय बेस्ट अ‍ॅक्ट्रेस म्हणून साऊथ अ‍ॅक्ट्रेस कीर्ती सुरेशला महानती या तेलगू सिनेमासाठी नॅशनल अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं आहे. बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्काकारानं सन्मानित करण्यात आलं.

बॉलिवूड स्टार अक्षय कुमारच्या पॅडमॅन या सिनेमाला बेस्ट सोशल फिल्म म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. आर बाल्की यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात अक्षय कुमार, सोनम कपूर आणि राधिका आपटे लिड रोलमध्ये होते.

या 4 बाल कलाकारांना अवॉर्ड

बाल कलाकारांच्या कॅटेगरीत यंदा मास्टर रोहित, मास्टर समीप सिंह रणौत, मास्टर ताल्हा अरशद आणि मास्टर श्रीनिवास यांना नॅशनल अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं.

बेस्ट सोपर्टींग अ‍ॅक्ट्रेस म्हणून बधाई हा या सिनेमातील सुरेखा सिकरीचा नॅशनल अवॉर्डनं सन्मान करण्यात आला.

कृति महेश विद्या हिला पद्मावत सिनेमातील घूमर या गाण्यासाठी बेस्ट कोरियोग्राफरचा अवॉर्ड मिळाला. हा सिनेमा संजय लीला भन्साळी यांनी डायरेक्ट केला होता. अभिनेत्री दीपिका पादुकोणवर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं.

 

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/