Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात 67 पोलीस ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, आतापर्यंत 59 जणांचा बळी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. सामान्य नागरिकांबरोबरच कोरोना योद्धे समजल्या जाणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलिसांना देखील कोरोनाचा संसर्ग अधिकच होत असल्याचे दिसून येत आहे. मागील चोवीस तासांत राज्यात आणखी 67 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सद्यस्थितीस 1 हजार 97 पोलिसांवर कोरोनाचा उपचार सुरु आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या 59 वर पोहचली आहे.

तसेच, मागील 24 तासात सीमा सुरक्षा दिलाचे (बीएसएफ) आणखी 53 जण कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहेत. तर चार जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या उपचार सुरु असलेल्या जवानांची एकूण संख्य 354 झाली आहे व आतापर्यंत 659 जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती, बीएसएफकडून देण्यात आली.

देशभरात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असला, तरी कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्याही वाढताना दिसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशभरात 3 लाख 34 हजार 822 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 29 जूनपर्यंत देशभरात 86 लाख 8 हजार 654 नमूने तपासणी करण्यात आली आहे. यातील 2 लाख 10 हजार 292 नमूने काल तपासले गेल आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like