Coronavirus : दिल्लीमधील CRPF च्या एकाच बटालियनमधील 68 जवान ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊननंतरही देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. शनिवारी सकाळपर्यंत हा आकडा ३७ हजारच्या पुढे गेला आहे. त्याचबरोबर आता निमलष्करी दलातही कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे. राजधानी दिल्लीत तैनात सीआरपीएफच्या ६८ सैनिकांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला असून त्यांना आयसोलेट करून त्यांच्यावर उपचार सुरु केले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचेही मॉनिटरिंग केले जात आहे.

सीआरपीएफच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व दिल्लीतील सीआरपीएफ कॅम्पमध्ये ६८ सैनिक पॉजिटीव्ह आढळले असून त्या बटालियनमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या १२२ झाली आहे. तर सीआरपीएफमधील १२७ सैनिकांना कोरोनाची लागण झाली आहे, ज्यात एकाचा मृत्यू झाला आहे, तर एकजण बरा झाला आहे. इतक्या मोठ्या संख्येने संक्रमित आढळल्यावर संपूर्ण कॅम्पला सील करुन सॅनिटाइज केले जात आहे. त्याचबरोबर बटालियनमध्ये त्याच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन केले जात आहे. आरोग्य विभाग सतत सर्वांचे मॉनिटरिंग करत आहे.

शनिवारी माहिती देताना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले की, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे २२९३ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण समोर आले असून रुग्णांची संख्या ३७३३६ झाली आहे. सोबतच कोरोनामुळे गेल्या २४ तासांत ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. राजधानी दिल्लीमध्येही ही परिस्थिती चिंताजनक असून तिथे आतापर्यंत ३७०० हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत.