बॉयफ्रेंडपेक्षा जास्त उंच आहे प्रेयसी, लोकांच्या टोमण्यांमुळे झाला त्रस्त मग नाईलाजाने केले ‘हे’ काम

नवी दिल्ली : नेहमी म्हटले जाते की जोड्या देव जुळवतो. परंतु काही लोक ही म्हण बाजूला सारून आपल्या पसंतीने पार्टन निवडतात. पण असे सुद्धा होते की, अशा व्यक्तींना समाजात काही बंधने घातली जातात किंवा टोमणे ऐकावे लागतात. एका व्यक्तीची उंची 5 फुट 6 इंच आहे, तर त्याच्या गर्लफ्रेंडची उंची 6 फुटापेक्षा जास्त आहे. ही जोडी एकमेकांवर खुप प्रेम करते. परंतु, काही बदमाश लोक असतात जे सर्वांनाच नावे ठेवतात. याच कारणामुळे हे कपल रात्रीच्या वेळी शॉपिंगला जाते.

या व्यक्तीच्या प्रेयसीला खुप वाईट वाटते जेव्हा लोक त्यांच्या रिलेशनशिपबाबत विचित्र गोष्टी करतात. इंग्लंडमध्ये राहणारी व्हेनेसा मार्फन सिंड्रोमने पीडित आहे ज्यामुळे तिची उंची खुप वाढली. व्हेनेसा म्हणते की, ती आणि तिचा बॉयफ्रेंड डॅनियल ब्राउनच्या उंचीत जास्त अंतर असल्याने लोक त्यांच्याकडे एकटक पहात असतात, जे त्यांच्या नात्यासाठी चांगले नाही.

व्हेनेसा म्हणते, लोक मला नेहमी हा प्रश्न विचारतात की, मी याच्यासोबत काय करत आहे? हे सर्व लोक मला सल्ला देतात की, मी उंच व्यक्ती शोधावा. मात्र, व्हेनेसाचा बॉयफ्रेंड म्हणतो की, लोकांच्या वाईट कमेंटमुळे नात्यावर दबाव येत आहे. याच कारणामुळे आम्ही दिवसा डेटिंगवर जात नाही आणि सोबत शॉपिंगला सुद्धा रात्रीच जातो. परंतु लोकांच्या फालतू गोष्टींचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही, आता ते एकमेकांवर खुप प्रेम करतात.

व्हेनेसा लोकांच्या वागण्याबद्दल सांगते की, या सर्वामुळे मी स्वत:ला प्रभावित होऊ देत नाही, पण लोक सुद्धा शांत बसत नाहीत. नेहमीच बहुतांश लोक मला हेच म्हणतात की, मी तर मॉडलिंगच्या जगतात असायला हवे होते. खरं तर त्यांना हे माहित नाही की मी आजारामुळे इतकी उंच आहे. हा सिंड्रोम लोकांना दिसत नाही परंतु मला जेवढे जाणवते तेवढे लोकांना सुद्धा जाणवले पाहिजे होते की, अखेर माझ्या शरीरात काय सुरू आहे.