Jio मध्ये अबू धाबीची कंपनी गुंतवणार 9093 कोटी रुपये

पोलिसनामा ऑनलाईन टीम – रिलायन्स ग्रुपमध्ये अजून एक मोठी कंपनी गुंतवणूक करणार आहे. अबू धाबीची ‘मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनी’ जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक करणार असल्याची माहिती शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (ठखङ) दिली आहे.

अबू धाबीमधील मोठी गुंतवणूक करणारी कंपनी म्हणून ‘मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनी’ ओळखली जाते. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 9, हजार 93.60 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीद्वारे कंपनी जिओमध्ये 1.85 टक्के हिस्सेदारी देण्यात आली आहे.

लॉकडाउनमध्येही गुंतवणुकीसह गेल्या सहा आठवड्यांमध्ये कंपनीत जगातील विविध आघाडीच्या कंपन्यांकडून एकूण 87 हजार 655 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याची माहितीही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने दिली. यापूर्वी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये मुबादलाव्यतिरिक्त फेसबुक, सिल्वर लेक, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलांटिक आणि केकेआर या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे भविष्यात काम करताना अजून सक्षमतेने काम करुन नागरिकांना सेवा देण्याचा मानस कंपनीने व्यक्त केला आहे.