6th Pay Commission | सर्व्हिस आणि रिटायर्ड कर्मचार्‍यांसाठी आली मोठी खुशखबर, 1 जुलैपसून लागू होणार सर्व नियम

अमृतसर : वृत्त संस्था – पंजाब (Punjab) च्या सरकारी कर्मचार्‍यांना कॅप्टन अमरिंदर सिंह सरकार (Capt. Amarinder Singh) ने 6th Pay Commission बाबत मोठी भेट दिली आहे. पंजाब सरकारने सहाव्या वेतन आयोगा (6th Pay Commission) च्या बहुतांश शिफारसी स्वीकरल्या आहेत. कॅबिनेटने शुक्रवारी सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसींना मंजूरी दिली. आता वेतन आयोगाच्या शिफारसी या वर्षी 1 जुलै 2021 पासून लागू होतील. आयोगाद्वारे ज्या शिफारसी करण्यात आल्या आहेत त्याचा लाभ एक जानेवारी 2016 पासून मिळेल.6th pay commission good news for punjab govt employee to get salary increment from july 1

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

रिटायर्ड कर्मचार्‍यांना सुद्धा होणार फायदा
पंजाब सरकार(Government of Punjab, India)च्या या निर्णयाचा 5.4 लाख सर्व्हिस आणि रिटायर्ड कर्मचार्‍यांना फायदा मिळेल. पंजाबचे अर्थमंत्री मनप्रीत सिंह बादल (Manpreet Singh Badal) यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Captain Amarinder Singh) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसींना मंजूरी देणे आणि त्या एक जुलैपासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांनी सांगितले की, याचा लाभ एक जानेवारी 2016 पासून मिळेल.

सॅलरीत दोन पटपेक्षा होईल वाढ

पंजाबच्या सहाव्या वेतन आयोगाने राज्याच्या सरकारी कर्मचार्‍यांची सॅलरी दुप्पट होईल. तसेच किमान सॅलरी 6,950 रुपयांवरून वाढून 18,000 रुपये प्रति महिना करण्याची शिफारस केली होती. ती 1 जानेवारी 2016 पासून प्रभावी करण्याची शिफारस केली होती. आयोगाच्या शिफारसींमुळे 2016 पासून प्रतिवर्ष 3,500 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च वाढण्याची शक्यता आहे.

कर्मचार्‍यांची सॅलरी आणि पेन्शनमध्ये सरासरी 20 टक्केच्या कक्षेत वाढ होण्याची शक्यता आहे. कर्मचार्‍यांच्या सॅलरीत पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारसीच्या तुलनेत 2.59 टक्केची वाढ होऊ शकते. सहाव्या वेतन आयोगच्या शिफारसींनुसार, सर्व प्रमुख भत्त्यांमध्ये वाढ प्रस्तावित आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : 6th pay commission good news for punjab govt employee to get salary increment from july 1

हे देखील वाचा

Big Breaking News

पुण्याच्या लोणीकाळभोर परिसरात ‘झूम बराबर झूम’ जोमात; पत्त्याच्या ‘क्लब’ आणि
‘मटका’ अड्ड्यावर गुन्हे शाखेचे रेड; 72 जणांवर कारवाई !

नेमकं काय आहे प्रकरण, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आता अवैध धंद्यांना
पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई करणार का ?

‘त्या’ पोलिसांवर कारवाई होणार का?