पुण्यात भरवर्गात सहावीच्या विद्यार्थ्याचे केस कापले

 पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 
पुण्यातील विश्रांतवाडी येथील एका शाळेत भरवर्गात इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे केस कापल्याची  घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलाच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर शिक्षिका,मुख्याध्यापक, संस्थाचालकांवर  बाल न्याय अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’083c6324-8f54-11e8-ac78-3d53ae6c712f’]
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, विश्रांतवाडी येथील एका शाळेत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे केस वाढले होते. अनेकदा त्याला केस कापून येण्याकरिता सांगितले होते. पण तरी  देखील तो केस कापून येत नव्हता. त्यानंतर शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या पालकाना नोटीस पाठवली. तरी देखील हा विद्यार्थी शाळेत केस कापून आला नव्हता. अखेरीस १७ जुलै रोजी शिक्षिकेने विद्यार्थ्याचे केस कापले. भर वर्गात केस कापल्यामुळे त्या विद्यार्थ्याला याचा राग अनावर झाला.
[amazon_link asins=’B07B4THQHM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1380729b-8f54-11e8-b713-4d27ea9a4801′]
या विद्यार्थ्याने शाळेत घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार विश्रांतवाडी पोलिसांनी चौकशी करून मुख्याध्यापिका, शिक्षिका यांच्यावर गुन्हा दाखल केला असून केस कापणाऱ्या शिक्षिकेला शाळा प्रशासनाने निलंबित केले आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.