महाराष्ट्रातील 7.2 लाख ऑटो रिक्षा चालकांना Lockdown मध्ये मिळणार सरकारी मदत, जाणून घ्या कशी मिळेल?

मुंबई : महाराष्ट्रात 7.20 लाख ऑटो रिक्षा चालकांना कोरोना व्हायरसमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान एकवेळ 1500 रुपयांची मदत देण्यासाठी 108 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. एका अधिकार्‍याने सांगितले की, यासाठी सरकारने 7 मे रोजी नोटिफिकेशन जारी केले होते.

कशी मिळणार सरकारी मदत –
अधिकार्‍याने सांगितले की, मदत पॅकेजसाठी परमिट, बॅज, गाडी आणि आधार कार्ड अपलोड करावे लागेल. ज्यानंतर रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनसारखे प्रतिबंध 14 एप्रिलपासून लागू केले होते. जे अजूनपर्यंत लागू आहेत. तर या प्रतिबंधामध्ये एका शहरातून दुसर्‍या शहरासह अंतर जिल्हा प्रवासावर सुद्धा प्रतिबंध लावला आहे आणि राज्यात अनावश्यक सेवा बंद केल्या आहेत.

मुंबईतून आली चांगली बातमी –
लागोपाठ वाढत असलेल्या कोरोना प्रकरणांच्या दरम्यान मुंबईतून चांगली बातमी समोर आली आहे. मुंबईत कोरोना व्हायरसच्या प्रकरणात घट नोंदली गेली आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत शनिवारी 2678 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर मागील एका दिवसात 3608 लोक बरे झाले आहेत.