IT Raid : WhatsApp Chat, E-mail ची तपासणी, कागदपत्रे, संगणक जप्त; जाणून घ्या धाडसत्रातील ‘या’ 10 महत्वाच्या गोष्टी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कर बुडवल्याप्रकरणी निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या कार्यालय व घरावर आयकर विभागाने बुधवारी धाडी टाकल्या आहेत. दोघांचीही अद्यापपर्यंत चौकशी सुरु असून नेमक काय घडल ते जाणू घेऊयात…

आयकर विभागाने बुधवारी ‘फँटम फिल्म्स’ या कंपनीच्या सहमालकांसह तापसी, अनुराग यांच्या घरावर व कार्यालयावर धाडी टाकल्या. हे धाडसत्र अद्याप सुरूच आहे. मुंबई आणि पुण्यातील २८ ठिकाणी ही कारवाई सुरू असून सेलिब्रिटींचं काम करणारे काही अधिकारी, क्वान आणि एक्सिड या टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्यांवरही छापे टाकण्यात आले आहेत. या छापेमारीत आयकर विभागाने काही कागदपत्रे, व्हॉट्सॲप चॅट, इमेल्स तसेच संगणक जप्त केले आहेत. तर दुसरीकडे तापसी आणि अनुराग यांना पुण्यातून पिंपरी चिंचवडमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहे.

दरम्यान, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दोन चित्रपट कंपन्या, दोन टॅलेंट कंपन्या आणि अभिनेत्रींच्या घरी छापा टाकला. त्यामध्ये ६५० कोटींची आर्थिक अनियमितता उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. प्राप्तीकर विभागातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार प्रॉडक्शन हाऊसचे कर्मचारी सुमारे ३०० कोटींच्या आर्थिक अनियमिततेबाबत कोणतेही स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. छाप्या दरम्यान, पाच कोटींची कॅश रिसीट सापडली आहे. ती तापसी पन्नूच्या नावाने असून त्याबाबतचा तपास सुरु आहे. तसेच ३५० कोटींची करचोरी झाल्याचेही पुरावे सापडल्याचे आयकर विभागाने सांगितले. तापसी पन्नू, अनुराग कश्यप यांच्यासोबतच फँटम फिल्म्सचे माजी प्रवर्तक विक्रमादित्य मोटवाने, विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले आहेत. या धाडीमध्ये आयकर विभागाकडून ‘फँटम कंपनी’ने केलेल्या अंतर्गत आर्थिक व्यवहारांची तपासणी होत आहे.

त्याचप्रमाणे कर बुडवल्याच्या पुराव्यांची शोधाशोध करण्यात आल्याचे समोर आले आहे. या धाडसत्राबाबत बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, २०१३ मध्ये जेव्हा कलाकारांवर कारवाई केली तेव्हा कोणीही काहीही विचारल नव्हत. मात्र, आता आमचे सरकार असताना जेव्हा अशा प्रकारची कारवाई होते. तेव्हा सर्वजण त्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. तर राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हार यांनी आयकव विभागाच्या धाडींवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे केंद्र सरकारच्या धोरणांबाबत जे लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांच्याच घरावर आयकरच्या धाडी पडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.