सौंदर्य खुलवण्यापासून ते भांडी चमकवण्यापर्यंत, जाणून घ्या लिंबाच्या सालीचे ‘हे’ 8 भन्नाट फायदे !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लिंबाचा विविध प्रकारे वापर केला जातो. कधी वजन कमी करण्यासाठी तर कधी पदार्थांची चव वाढवण्यासाठी. परंतु त्याचा वापर केल्यानंतर लोकं त्याची साल मात्र फेकून देतात. सौंदर्य खुलवण्यासाठी आणि इतरही अनेक गोष्टींसाठी लिंबाच्या सालीचा वापर केला जातो. आज आपण याच्या विविध वापरांबद्दल माहिती घेणार आहोत.

1) अनेकदा चहा, कॉफीनंतर किंवा काही बनवण्यासाठी भांड्याचा गॅसवर वापर केल्यानं त्याच्यावर काळा थर जमा होतो. हा थर काढण्यासाठी लिंबाच्या सालीचा वापर केला जाऊ शकतो.

2) जेवणाच्या भांड्याला अनेकदा आतून चिवटपणा रहातो. साबणानंही तो जात नाही. अशा वेळी जर लिंबाच्या सालीचा वापर करून ती भांडी घासली तर चिवटपणा लगेच निघून जातो.

3) कुकरमध्ये भात शिजवताना कुकर आतून काळा पडतो. अशावेळी त्यात पाण्यासोबत लिंबाची एक साल देखील ठेवावी. यामुळं कुकर आतून काळा होत नाही.

4) फ्रिजमध्ये जर दुर्गंध येत असेल तर लिंबाच्या साली ठेवाव्यात. सालींच्या वासामुळं फ्रीजमधील दुर्गंधी कमी होते.

5) घरात मुंग्या येत असतील तर ज्या ठिकाणाहून त्या जातात तिथे लिंबाची साल ठेवावी. असं केल्यानं मुंग्यांसह इतर लहान कीटकांचा त्रास कमी होतो.

6) लिबांच्या सालीचा वापर तुम्ही नखं स्वच्छ करण्यासाठी देखील करू शकता.

7) लिंबाची साल पाय किंवा हातांच्या बोटावर अलगद फिरवल्यास नखं तर स्वच्छ होतातच, परंतु नखांवर एक वेगळीच चमकही येते.

8) हातांचे कोपरे काळवंडले असतील तर त्या ठिकाणी लिंबाच्या सालीनं मसाज करावी. यामुळं तिथली त्वचा उजळते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.