जीवन विमा पॉलिसीमध्ये होणार ‘हे’ 7 मोठे आणि महत्वाचे बदल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विमा पॉलिसीच्या नियमांमध्ये केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात बदल केले असून यामुळे पॉलिसीधारकांना मोठ्या प्रमाणात फायदा मिळणार आहे. इन्शुरन्स अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाने यासंदर्भात नवीन नियम जाहीर केले होते.

हे आहेत नवीन नियम 

१) ६० टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकता

पेन्शन प्लॅनमध्ये यापुढे तुम्ही जास्तीत जास्त ६० टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकता. नॅशनल पेंशन सिस्टम योजनेत तुम्ही यापुढे ६० टक्क्यांपर्यंत रक्कम एकसाथ काढू शकता. त्याचबरोबर या काढलेल्या पैश्यांवर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागणार नाही. याच पॉलिसीच्या पेन्शन प्लॅनमधील देखील तुम्ही ६० टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकता. या नियमाविषयी माहिती देताना आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्सचे अधिकारी अनिल कुमार सिंह यांनी सांगितले कि, ६० टक्क्यांपर्यंत रक्कम हि आयकर फ्री असेल मात्र त्यापुढील रकमेवर नियमाप्रमाणे आयकर भरावा लागेल. मात्र या ६० टक्के रकमेच्या काढण्यासंबंधी देखील काही नियम आहेत. हि रक्कम तुम्ही मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, मुलांच्या लग्नासाठी आणि घर खरेदीवेळी तुम्ही हि रक्कम काढू शकता.

२) इक्विटी सेव्हिंग फंडात गुंतवणूक 

मुच्युअल फंडांची हायब्रिड श्रेणी म्हणजे इक्विटी सेव्हिंग्ज फंड. या फंडात जोखमीचे प्रमाण कमी असते याचे कारण म्हणजे त्यात विविध प्रकारच्या स्टॉकचा समावेश असतो. वैविध्यपूर्ण इक्विटी स्टॉक, डेट आणि आर्ब्रिट्रेजमध्ये यातील निधी गुंतवला जातो. यातील नेट लाँग इक्विटीमुळे मूळ गुंतवणुकीचे मूल्य वाढण्यास मदत होते. तर, आर्ब्रिट्रेज व डेट सेक्युरिटिजमुळे परताव्यांमध्ये स्थैर्य येते.

 ३) ऐन्युटी मध्ये जास्त पर्याय 

मॅक्स लाईफ इन्शुरन्सचे डायरेक्टर आलोक भान यांनी याविषयी बोलताना सांगितले कि, सध्या पॉलिसीधारकाला पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर त्याचा कंपनीची ऐन्युइटी घ्यावी लागते. त्यामुळे ग्राहकांना याचा मोठा फटका बसतो. स्पर्धा कमी झाल्यामुळे आता यामध्ये पॉलिसीधारकांचा फायदा होणार असून ऐन्युइटी हि  अशी रक्कम आहे जी पॉलिसी कंपनी त्यांना गुंतवणुकीपासून ते त्यांच्या मृत्यू पर्यंत पेन्शनच्या रूपात मिळत असते.

४) हफ्ता कमी करण्याचा निर्णय

या नियमांमुळे ग्राहकांना अधिकार मिळणार असून यामध्ये ग्राहक आपल्याला पॉलिसीचा किती हफ्ता घ्यायचा आहे हे ठरविणार आहे. पॉलिसी घेतल्यानंतर पाच वर्षांनी ग्राहकाला हफ्ता काम करण्याचा अधिकार मिळणार आहे. तुम्ही ५० टक्क्यांपर्यंत  हफ्त्याची रक्कम कमी करू शकता.

५) सरेंडर किंमत ठरण्याचा कालावधी कमी 

या नवीन नियमांद्वारे तुम्हाला आता सरेंडर किंमत ठरण्याचा कालावधी देखील कमी झाला आहे. यामध्ये पॉलिसी पूर्ण होण्याच्याआधी तुम्ही हि पॉलिसी बंद करू शकता. या नवीन नियमांमार्फत आता तुम्ही हवे तेव्हा हि पॉलिसी बंद देखील करू शकता.यापूर्वी तुम्हाला कमीतकमी तीन वर्ष या पॉलिसीचा हफ्ता भरण्याची गरज होती.

६) युलिफमध्ये कमी लाइफ कव्हर

या नवीन नियमांद्वारे तुम्हाला आता वार्षिक प्रीमियम १० पटींऐवजी फक्त सात पटच द्यावा लागणार आहे. जुन्या नियमांमध्ये ४५ वर्षांखालील ग्राहकांना कंपनी वार्षिक प्रीमियमची १० पट तर ४५ वर्षांवरील व्यक्तीला ७ पट प्रीमियम कव्हर देत आहे. मात्र यापुढे या दरांमध्ये कपात केली जाणार आहे.

७) रिव्हायव्हल वेळ वाढली 

या नवीन नियमांनुसार युलिप रिव्हायव्हल करणाऱ्यांसाठी हि खुशखबर आहे. यामध्ये आता तुम्हाला दोन वर्षांऐवजी तीन वर्ष मिळणार आहेत. यामध्ये तुमची पॉलिसी संपण्याअगोदर तीन महिने आधी कंपनीला याची माहिती द्यावी  लागणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –