एक वेगळी ‘गोशाळा’ आणि जिवंतपणी ‘स्वर्ग’ पाहण्यासाठी 7 दिवसांचं मोफत शिबीर, कुटुंबासह लाभ घ्या, ‘असं’ करा रजिस्ट्रेशन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंदोर आणि मध्य प्रदेशात जवळपास 100 च्या आसपास देशी गीर गाई बांधलेला मुक्त गोठा आहे. ही संपूर्ण गोशाळा नोकरमुक्त, संपूर्ण गोशाळा कुटुंबातील 15 वर्षाखालील मुले चालवतात. शेण काढण्यापासून दूध काढण्यापर्यंत सर्व कामे 15 वर्षाखालील मुले, मुली करतात. पहाटे 5 वाजता ही मुले आई वडिलांनी न उठवता, स्वतः उठून गोशाळेत हजर असतात. रेडिओवर गाणी ऐकत डान्स केल्यासारखे शेण आणि दूध काढतात. आई वडिलांना मुलांच्या मोबाईल आणि टीव्ही बघण्याची चिंता नसते. मुलांसाठी गोशाळा हा दैनंदिन उत्सव असतो. 100 गाईंना माणसासारखी नावे दिली आहेत, गाईला हाक मारल्यावर फक्त तीच गाय दूध देण्यासाठी बाहेर येते.

महत्वाची गोष्ट म्हणजे येथील लोक गाईला फक्त गोमाता म्हणून सांभाळत नाहीत पण फक्त गोमाता म्हणून सांभाळणाऱ्या लोकांपेक्षा जास्त चांगली सांभाळतात. गाईला फक्त गोमाता म्हणून सांभाळण्यापेक्षा तिची शास्त्रीय माहिती, तिचा मनुष्याला असणारा उपयोग, गाईचा मानवाशी आणि निसर्गाशी असलेला संबंध जर आपण पुढच्या पिढीला सांगू शकलो तरच इथून पुढची पिढी गोपालन करू शकेल. तुम्ही कधी 100 गाईंची नोकरमुक्त गोशाळा या आधी पाहिली आहे का ? गोशाळा नोकरमुक्त का असावी हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावे लागेल.

अशा खूप काही गोष्टी समजून घेण्यासाठी 24 ते 30 डिसेंबर 7 दिवसांचे शिबीर आयोजित करण्यात येत आहे. आपण सर्वजण सहकुटुंब आमंत्रित आहात. अध्यात्मात सांगितलेला स्वर्ग पहायचा असेल तर त्यासाठी मरणे आवश्यक आहे पण जिवंतपणी कुटुंबातील सर्वांना एकत्र स्वर्ग पहायला मिळणार असेल तर एक ट्रिप म्हणून जायला काय हरकत आहे ?

सह कुटुंब आमंत्रण(शिबीर).
दिनांक- 24 ते 30 डिसेंबर 2019.
स्थळ –इंदोर, मध्य प्रदेश

या शिबीरास कसलीही फी नसून ते मोफत आहे. राहणेही मोफत आहे. तुम्हाला फक्त जेवायचा खर्च करायचा आहे. हा खर्च 270 रुपये प्रति दिवस प्रमाणे 7 दिवसांचा एकूण खर्च 1890 रुपये प्रति व्यक्ती असेल. मुख्य म्हणजे ७ वर्षाखालील मुलांसाठी जेवायचा खर्च सुद्धा नाही.

शिबीरात सहभागी होण्यासाठी काय कराल ?
शिबीरात सहभागी होण्यासाठी तुम्हाला 500 रुपये भरून आधी ऑनलाईन बुकिंग करणे गरजेचे आहे. उर्वरीत रक्कम 1390 रुपये शिबीराच्या ठिकाणी भरावी लागेल. शिबीराच्या ठिकाणी स्वखर्चाने जायचे आहे. यासाठी स्लीपर बस, रेल्वे, विमान पर्याय उपलब्ध आहेत. स्वतःचे वाहन असेल तर पुण्याहुन अंतर 650 किमी. अंदाजे 12 तासाचा प्रवास. कुटुंबासोबत जाता-येताना फिरण्यासाठी इतरही भरपूर ठिकाणे आहेत. तुमच्या आयुष्यात आलेली दुर्मिळ संधी. तुमच्या आयुष्यातील सर्व अनुत्तरीत प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळण्याची खात्री. आपल्या कुटुंबासोबत घ्यायचा एक अविस्मरणीय अनुभव. सुखाच्या शोध घेणाऱ्या व्यक्तींसाठी कायमस्वरूपी सुख मिळण्याचा मार्ग. यात अनेक काल्पनिक, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्ष घडताना पाहू शकता.

इंदोरमधील गोशाळेच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी
1.
शाळा – मुलांना फी नाही, शिक्षकांना पगार नाही.

2. जगण्यासाठी नोकरी आणि व्यवसाय यापैकी दोन्हीची आवश्यकता नाही.

3. 20 परिवारातील एकूण 100 सदस्यांचे एकच स्वयंपाकघर, नरनारी समानता मानल्यावर स्त्रीचे आयुष्य कसे असू शकेल तूम्ही कल्पना करा. मुलींना लग्न करायचे असेल तर हुंडा लागणार नाही. भटजी, वरात, दागिन्यांची आवश्यकता नाही. इतकेच काय चांगले दिसण्याची सुद्धा आवश्यकता नाही आणि शिक्षणाचीही अट नाही. मुलींना नोकरी करण्याची आवश्यकता नाही.

4. ही नेहमीच्या प्रकारची शाळा नाही. या शाळेला वर्ग नाहीत. स्पर्धात्मक शिक्षण नाही. भविष्यात नोकरी मिळेल की नाही आणि व्यापार करावा लागेल की नाही याची चिंता नाही. आपल्या वयातील मुलांची शारीरिक क्षमता किती आहे हे इथे पाहिल्याशिवाय समजणार नाही.

5. इथला परीसर – 18 एकर जागा. 20 परिवार, 100 सदस्य, संपूर्ण सेंद्रिय शेती. प्रत्येक व्यक्ती स्वतः काहीतरी उत्पादन करण्याची धडपड करताना दिसतो. संपूर्ण परिसर नोकरमुक्त.

6. गोशाळा – भारतातील पथमेडा येथे सर्वात मोठी गोशाळा आहे परंतु येथील गोशाळेचे वैशिष्ट्य वेगळेच आहे.ही 100 गाईंची गोशाळा आहे. संपूर्ण गोशाळा 15 वर्षाखालील मुले चालवितात आणि गोशाळा नोकरमुक्त आहे. तुम्ही कधी लहान मुलांनी चालविलेली नोकरमुक्त गोशाळा पाहिली नसेल.

7. इथले परिवार – जात, धर्म, देश या पैकी कुठल्याही मानव निर्मित भिंती न मानता फक्त मानव हीच एक जात आहे असे मानणारे परिवार आहेत. जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे परंतु त्याला फार महत्व न दिल्यामुळे पैसा असणारे आणि पैसा नसणारे दोघेही एकत्र जगताना दिसतात.

8. मानव लक्ष्य – सुख आणि दुःख या नाण्याच्या दोन बाजू नसून कायमस्वरूपी निरंतर सुख मिळू शकते यासाठी निश्चित मार्ग आहे आणि ते मिळविण्यासाठी प्रयत्न करणारे सर्वजण. समाजसेवा करताना इतर लोक ज्या गोष्टींसाठी स्वतःच्या आयुष्यातील वेळ आणि संपत्ती खर्च करतात त्या सर्व गोष्टी येथील लोकांच्या जगण्याचा एक भाग आहे.

ऑनलाइन नावनोंदणी
ज्याला तुम्ही स्वर्ग किंवा रामराज्य म्हणू शकता असे 100 परिवाराचे एक नवीन गावच वसविण्याची तयारी चालू आहे. आपल्या डोळ्यांनी या घटनेचे तुम्ही साक्षीदार होऊ शकता. 7 दिवस संपूर्ण कुटुंबासह सहल म्हणून हे सर्व स्वतःच्या डोळ्यांनी पहायला काय हरकत आहे. सकारात्मक जगण्यासाठी अजून एक पर्याय आहे. एवढी उपलब्धी तर शिबीर करून तुम्हाला नक्की मिळू शकते अशी खात्री आहे. तुम्हाला शिबिराला यायची इच्छा असेल तर तुम्हाला ऑनलाइन नावनोंदणी करावी लागेल.

शिबिरात काय सांगतात याची माहिती हवी असेल तर…
शिबिराच्या नंतर दोन-तीन दिवस आजू बाजूची ठिकाणे पाहण्यासाठी वेळ काढा. फिरण्यासाठी इंदोर राजवाडा, उज्जैन अशी खूप ठिकाणे जवळ आहेत. गुगलवरून काही माहिती मिळवू शकता. शिबिरातही काही माहिती दिली जाते. शिबिरात काय सांगतात याची माहिती हवी असेल तर गुगलवरवर Ajay dayma,jivan vidya,parichay shibir असे सर्च करा.

नावनोंदणीसाठी www.mcvkworld.com वर नोंदणी करा. अजून काही माहिती हवी असेल तुमचे नाव आणि इंदोर शिबिर असा मेसेज 9225513999 वर व्हॉट्सअॅप करणे. आपल्या पुढच्या पिढीसाठी एकदा तरी शिबिर करणे गरजेचे आहे असे आम्हाला वाटते.

टीप :- कृपया फोन करू नये ही नम्र विनंती.
सर्वाचे स्वागत ……………

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like