पुण्याच्या चीनी कंपनीतील 7 कर्मचार्‍यांना ‘कोरोना’ची लागण

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून अनलॉक मध्ये सुरु झालेल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये कोरोना साथीचा प्रसार होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत औद्योगिक क्षेत्रात कोरोना विषाणूने शिरकाव केला नव्हता. मात्र, आता 7 जण कोरोना पॉझिटिव्हि आढळून आल्याने औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवड शहराला लागून असलेल्या खेड तालुक्यातील चाकण येथे एका चिनी कंपनीतील सात कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याची पुष्टी झाली आहे. यामध्ये एका चीनच्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे.

असे सांगितले जातेय की, या कंपनीचे चिनी अधिकारी लॉकडाऊन होण्यापूर्वी चाकण येथील प्लांटमध्ये आले आणि नंतर येथे अडकले. खेडचे तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही चिनी कंपनी मशीनरी व खाण उपकरणे तयार करते. गेल्या आठवड्यात एका कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली. यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यानंतर एका चिनी नागरिकासह सहा जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले.

ही प्रकरणे समोर आल्यानंतर कंपनीतील चिनच्या 9 नागरिकांसह कंपनीतील 130 कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे चिनी कंपनीचे कर्मचारी असून चिनी कंपनीचे चाकणमध्ये मशीनरी आणि खाण उपकरणे तयार करण्याचा एक युनिट आहे. मागील आठवड्यात एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये चिनच्या नागरिकासह 7 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. संक्रमित कर्मचाऱ्यांवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.